Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विजय शहांचा माफीनामा फेटाळला, अटकेला स्थगिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

विजय शहांचा माफीनामा फेटाळला, अटकेला स्थगिती

admin
Last updated: 2025/05/19 at 6:05 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

– कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधानाचे प्रकरण

– सर्वोच्च न्यायालयाने दिले एसआयटी चौकशीचे आदेश

नवी दिल्ली, 19 मे (हिं.स.) : कर्नल सोफिया कुरेशींच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहांची माफी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. परंतु, त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत.

विजय शाह यांच्या वकिलाने सांगितले की त्यांच्या अशिलाने माफी मागितली आहे. याबद्दल न्यायालयाने त्यांना खडसावले. तुम्ही लोकांसमोर पूर्णपणे उघडे पडला आहात. तुम्ही एक सार्वजनिक व्यक्ती आहात. बोलताना तुम्ही तुमच्या शब्दांचा विचार केला पाहिजे अशा शब्दात कोर्याने खडसावले तसेच याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. या एसआयटी पथकात 3 आयपीएस अधिकारी असतील, ज्यात एक आयजी आणि उर्वरित 2 एसपी दर्जाचे अधिकारी असतील.

या अधिकाऱ्यांपैकी एक महिला असणे अनिवार्य असेल. सर्व अधिकारी मध्य प्रदेश केडरचे असू शकतात, परंतु ते राज्यातील मूळ रहिवासी नसावेत. एसआयटी 28 मे पर्यंत स्थिती अहवाल सादर करेल.मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गेल्या 14 मे रोजी शाह यांच्या विधानाची दखल घेतली आणि एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्याविरुद्ध इंदोरच्या महू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. याविरुद्ध शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

इंदोरच्या महू येथील रायकुंडा गावात 11 मे रोजी झालेल्या हलमा कार्यक्रमात मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हटले होते की, ‘त्यांनी आमच्या हिंदूंचे कपडे काढून त्यांची हत्या केली आणि मोदीजींनी त्यांच्या बहिणीला त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले.’

शाह पुढे म्हणाले, ‘आता मोदीजी कपडे तर काढू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी त्यांच्या समुदायाच्या बहिणीला पाठवले की जर तुम्ही आमच्या बहिणींना विधवा केले असेल तर तुमच्या समुदायाची बहीण येऊन तुम्हाला नग्न करून सोडून जाईल. तुमच्या जातीच्या आणि समुदायाच्या बहिणींना पाकिस्तानात पाठवून आपण देशाच्या सन्मानाचा आणि आपल्या बहिणींच्या कुंकवाचा बदला घेऊ शकतो असे शाह म्हणाले होते.

——————————

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायमूर्ती गवई झाले नाराज
Next Article संभलच्या जामा मशिदीचे पुन्हा सर्वेक्षण होणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?