सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्याच्या होरपळीत पेटलं पाणी, ‘या’ नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे फुटताहेत तोफगोळे
खास प्रतिनिधी
सोलापूर : उन्हाची धग प्रचंड जाणवतेय. पारा 41.4 ला गेला आहे. जिल्ह्यातील शेतशिवारात पाण्याचा मुद्दा ‘कळी’चा बनतोय. उष्णतेच्या धगीने पिके जागीच होरपळताहेत. पाण्याचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर झाला आहे. अशातच पिलीव-माळशिरसचे पाणी चांगलेच पेटले आहे.अकलूजकर मोहिते-पाटील आणि सांगोलकर पाटील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालंय. या उभतांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे तोफगोळे जणू जोरदारपणे फुटताहेत. त्याच्या ठिकर्या मुख्यत्वे, सांगोला, माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उडताहेत. माजी आमदार शहाजी पाटील यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना आता पुन्हा पाण्यासंबंधी आव्हान दिले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनीच पाणी अडविल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी लावला आहे. त्यासाठी त्यांनी पाण्यासंबंधीच्या माहिती समोर केली आहे.
विशेषत्वे, माजी आमदार पाटलांच्या गंभीर आरोपांवर अकलूजकर मोहिते-पाटील परिवाराच्यावतीने खासदार धैर्यशील मोहिते-पाटील काय उत्तर देतात, याकडे जिल्ह्याचं पुन्हा लक्ष लागणार आहे. पाण्याचा पेटलेला मुद्दा विझवायला कोण फुंकर घालणार? पाण्याचा ताणला जात असलेला मुद्दा देशमुख आणि मोहिते-पाटील हे आणखी किती ताणणार? यासंबंधीचं औत्सुक्य उभ्या सोलापूर जिल्ह्याला असणार आहे.
पाणी अडविणार्या खासदाराला तुम्ही निवडून दिलं आणि पाणी देणार्या माणसाला तुम्ही घरी बसवलं, असे सांगून ‘काय पाप केलं तुम्ही असे’ असे म्हणून स्वतःच्याच थोबाडीत मारून घेणारे माजी आमदार शहाजी पाटील यांनी आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माळशिरस तालुक्यातील पिलिवला मी मिळालेले पाणी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घालविण्याचे काम केले आहे, त्यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माझ्यावर आरोप करू नयेत, असे उलट नवे आव्हान शहाजी पाटलांनी मोहिते-पाटील यांना दिले आहे.
माजी आमदार पाटील म्हणाले, तोंडात मारून घेणे, हा पश्चातापाचा भाग होता आणि तो सर्व जनतेला माझा हेतू कळालेला आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. त्यात त्यांनी पाण्यासंदर्भात आम्ही कुठं अन्याय केलेला नाही. उलट शहाजी पाटील यांनीच माळशिरसचे पाणी पळविले आहे, असे म्हटले आहे.
(स्व.) गणपतराव देशमुख यांनी 2001 मध्ये उजनी धरणाच्या सांगोला तालुक्यासाठीच्या पाणी योजनेची प्रशासकीय मान्यता घेतली होती. त्यानंतर 2005 मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने ही प्रशासकीय मान्यता रद्द केली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 2001 चे प्रशासकीय परिपत्रक काढून बघावे. पिलिवच्या महालिंगरायाच्या टेकडीपासून पाणी देण्याचे धोरण होते. या टेकडीपासून सांगोला विधानसभा मतदारसंघाला म्हणजेच संगोला तालुका आणि माळशिरस तालुक्यातील पिलिव भागाला सुमारे 3. 81 टीएमसी पाणी देण्याचं ठरलं होतं, असेही शहाजी पाटील यांनी म्हटले आहे.
तत्कालीन जलसंपदा मंत्री महादेवराव शिवणकर यांनी मला सांगोला तालुक्यासाठी 3. 81 टीएमसी पाणी दिलं होतं. उर्वरीत 3. 81 टीएमसी पाणी जिल्ह्यातील राहिलेल्या तालुक्यांना होते. पण, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर 1.81 टीएमसी म्हणजेच जवळपास दोन टीएमसी पाणी हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्याला नेण्यात आले. दोन टीएमसी पाणी हे सांगोला तालुक्याला देण्यात आले.
विजयदादांनी लढाच दिला नसल्याचा गंभीर आरोप सांगोला आणि पिलिव भागाचे 1.81 टीएमसी पाणी परांड्याला नेण्याचा निर्णय झाला, त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विजयसिंह मोहिते -पाटील यांनी पिलिव भागाच्या पाण्यासाठी कोणताही लढा दिला नाही. त्यांनी त्या भागासाठी पाणी मागितलं नाही. पिलिव भागाचे पाणी घालवण्याचे खरं काम हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आ
शहाजीबापू पाणी घालविण्याच्या मुद्यावर ठामच
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माझ्यावर पिलिवचे पाणी पळविण्याचा आरोप मुळीच करू नये. उलट मी पिलिवसह पाणी मागितलं होतं. मला ते मिळालंही होतं. पण, मी मिळविलेले पाणी घालवण्याचे काम मोहितेपाटील यांनी केले आहे, असा गंभीर आरोपही शहाजी पाटील यांनी केला.