Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाचखोरी प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यासह तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

लाचखोरी प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यासह तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी

Surajya Digital
Last updated: 2023/01/07 at 10:22 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● कुंभारी जवळ चार चाकी वाहन कट मारल्याने दुचाकी वरील तरुण ठार; भाऊ जखमी● येणेगुर जवळ अपघात; पादचारी ठार

सोलापूर : घरकुलचा हप्ता मिळण्यासाठी पंचायत समितीला अहवाल पाठविण्याकरिता २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांसह तिघांना न्यायालयाने प्रत्येकाला पाचवर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. Five years of hard labor for Mohol Solapur along with village development officer in bribery case

 

टाकळी सिकंदर येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी, तत्कालीन सरपंच नवनाथ तुळशीराम अनुसे व तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचारी मोहम्मद कचरोद्दीन पठाण अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुलै 2012 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी पंचायत समिती मोहोळ या ठिकाणी अहवाल पाठवण्यासाठी आरोपींनी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संपर्क साधून तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने लाचेचा सापळा लावला होता. त्यावेळी तिघांना लाच स्वीकारल्यानंतर पकडण्यात आले होते. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपअधीशक गणेश जवादवाड यांनी करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्यासमोर झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये दोषी धरून पाचवर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे ॲड. अल्पना कुलकर्णी तर आरोपींतर्फे ऍड राहुल खंडाळ, अँड निलेश जोशी, ऍड व्ही. पी. शिंदे यांनी काम पाहिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● कुंभारी जवळ चार चाकी वाहन कट मारल्याने दुचाकी वरील तरुण ठार; भाऊ जखमी

सोलापूर- चार चाकी वाहन पाठीमागून कट मारल्याने दुचाकी वरून घसरून तरुण ठार तर त्याचा भाऊ जखमी झाला. हा अपघात सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील कुंभारी जवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला.
 नागेश सुरेश श्रीमंडी (वय २४ रा.मदर इंडिया झोपडपट्टी, कुमठा नाका सोलापूर) असे मयताचे नाव आहे. तर त्याचा भाऊ सिद्धराम श्रीमंडी हा जखमी झाला आहे. ते दोघे काल मैंदर्गी येथे पाहुण्याकडे गेले होते. तेथून परत सोलापूरकडे येताना रात्री ९ च्या सुमारास कुंभारी येथील कामत हॉटेल जवळ पाठीमागून चार चाकी वाहनाने कट मारुन तसाच पूढे गेला. त्यामुळे दोघे भाऊ दुचाकीवरून कोसळून जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता नागेश श्रीमंडी हा उपचारापूर्वी मयत झाला.
मयत नागेश हा अविवाहीत असून तो फायनान्स कंपनीत काम करीत होता. त्याच्या पश्चात आई वडील ३ भाऊ आणि १ बहीण असा परिवार आहे. या अपघाताची नोंद वळसंग पोलिसात झाली.सहाय्यक फौजदार रावडे पुढील तपास करीत आहेत.

● येणेगुर जवळ अपघात; पादचारी ठार

हैद्राबाद महामार्गावरील येणेगुर येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने मुसा इकबाल पटेल( वय५५ रा.कोळनूर पांढरी,ता. लोहारा) हा पादचारी गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाला. बुधवारी सायंकाळच्या सुमारात हा अपघात घडला. त्यांना उमरगा येथे प्राथमिक उपचार करून इकबाल (भाऊ) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान ते पहाटे मयत झाले, अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Fiveyears #hardlabor #Mohol #Solapur #village #development #officer #briberycase, #लाचखोरी #प्रकरणी #ग्रामविकास #अधिकारी #तिघांना #पाचवर्षे #सक्तमजुरी #सोलापूर #मोहोळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात 17 व्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचे आयोजन
Next Article कर्ज मिळवून देतो म्हणून तब्बल एक कोटीची फसवणूक; सोलापुरात मयत व्यक्तीसह तिघांवर गुन्हा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?