Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविकांना 50 लाखाचे विमा कवच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रHot News

सप्टेंबरपर्यंत ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविकांना 50 लाखाचे विमा कवच

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 10:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

कोल्हापूर : बैत्तुल माल कमिटीने विविध जाती धर्माच्या ५५ कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्याबद्दल या समितीला सलाम करुया. त्यांच्यासह कोरोना मृतदेहांवर शहरी क्षेत्रात अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी ५० लाखाचे विमा कवच मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच ग्रामीण भागासाठी सप्टेंबरपर्यंत ५० लाखाचे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

राज्यातील सर्व नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० आणि संशमनी वटी औषधांचे वाटप करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्याचा शुभारंभ येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यातील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिने  हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मालेगावच्या युनानी काड्याचा यात समावेश करण्यात आला आहे. ग्रामसेवक,आशा, अंगणवाडी सेविका या सर्वांना सप्टेंबरपर्यंत ५० लाखाचे विमा कवच लागू करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रमाणे जिल्हा परिषदेची बैठकही व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे घेता यावी. या उद्देशाने आज सदस्यांना टॅबचे वाटप करण्यात येत आहे. व्हिसीद्वारे बैठकीस काही मर्यादा येत असल्या तरी मनात कोणतीही शंका राहता कामा नये यासाठी सदस्यांकडून लेखी प्रश्न घेऊन त्यांना लेखी उत्तरे द्यावीत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढणार आहे. परंतु, मृत्यूदर कमी करण्यासाठी काम करा. बेड मिळाला नाही अशी बातमी येणार नाही यासाठी यंत्रणा उभी करा. पोलीस, महसूल, आशा, डॉक्टर जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. यात खासगी रुग्णालयेही चांगले काम करत आहेत. परंतु, अद्यापही काही रुग्णालये चालू करत नाहीत. त्यांच्यासाठी मेस्मा लावावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

याचबरोबर, तपासण्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही संख्या आणखी वाढणार आहे. राज्यात अनुभव नसतानाही मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत.  जिल्ह्यात पालकमंत्री बंटी पाटील यांचेही अतिशय उत्कृष्ट काम सुरु आहे. ही वेळ टीका-टिप्पणी, आंदोलन करण्याची नसून सर्वांनी एकत्र येऊन आलेल्या संकटावर मात करण्याची आहे, असे उदगार ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी काढले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बाल विकास समिती सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, शिक्षण सभापती प्रविण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #विमाकवच #आशावर्कर #ग्रामसेवक #बैत्तुलमालकमिटी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खानापुरातील रामापूर – कमळापूर पूल गेला पाण्याखाली; बलवडी बंधारा वाहू लागला
Next Article देवेंद्र फडणवीसांना आली उपरती; महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलानाच होऊ शकत नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?