Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात कांदा विक्रीची पावती व्हायरल करून शेतक-यानी मांडली व्यथा, राजू शेट्टीही संतप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापुरात कांदा विक्रीची पावती व्हायरल करून शेतक-यानी मांडली व्यथा, राजू शेट्टीही संतप्त

Surajya Digital
Last updated: 2021/12/03 at 12:12 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा बळीराजावर संकट कोसळले आहे. याआधीच अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कांदा उत्पादक शेतक-यांचे तर कंबरडच मोडले आहे. असा ज्वलंत प्रकार सोलापुरात पाहावयास मिळाला.

अतिवृष्टी, अवकाळी अशा संकटांना तोंड देत शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकविलेला ११२३ किलो कांदा विकून त्याच्या पदरात केवळ १३ रूपये शिल्लक राहिले. यामुळे व्यथित झालेले शेतकऱ्यानी सोशल मीडियावर आपली कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर व्हायरल करून व्यथा मांडली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गुरूवारी (ता.२) बापू कवडे या शेतकऱ्याने आपला २४ पिशवी (पॉकेट) कांदा विक्रीसाठी आणला होता. हा कांदा या शेतकऱ्याने रूद्रेश पाटील या अडत दुकानदाराकडे विक्री केला. कवडे यांच्या कांद्याची प्रतवारी करण्यात आली. त्यातील काही किलो कांद्याला १००,१५०,२०० रूपये असा प्रति क्विंटलला दर देण्यात आला. त्याचे एकूण १६६५ रूपये झाले. त्यातून हमाली, तोलाई व गाडीभाडे असे १६५१ रूपये खर्च झाले. त्यामुळे शेतकरी कवडे यांच्या हातात फक्त १३ रूपये शिल्लक राहिले. त्यामुळे व्यथित होऊन शेतकऱ्याने आपली कांदा विक्रीची पावती सोशल मीडियवर व्हायरल केली. हे ऐकून- पाहून शेतकऱ्यांनी पुढे कांदा पीक घ्यावे का नको याबाबत विचार करत आहेत.

सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे काढायला आलेला कांदा खराब झाला आहे. नासलेला कांदा हा विकला जात नाही, अशी परिस्थिती आहे. जो काही कांदा विकला गेला त्याला क्विंटलमागे खूप भाव मिळाला आहे. फक्त सोलापूरमध्ये नाही तर राज्यात अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कांदा खराब झाला असल्याने पुढील काही दिवसात बाजारात कांद्याची आवक कमी होणार असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

या १३ रूपयामधून सरकारचे १३ वा घालावे का ?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल बापू कावडे या शेतकर्यांने २४ पोते कांदे रूद्रेश पाटील या व्यापा-याला विक्री केले. जवळपास ११२३ किलो कांदे विकून pic.twitter.com/ZergTblfF0

— Raju Shetti (@rajushetti) December 2, 2021

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशात प्रचंड पाऊस आहे. त्यामुळे तेथील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली आहे, त्यामुळे दर कोसळल्याचे बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वीही काढणीला आलेला कांदा अतिवृष्टीमुळे वाया गेला होता. शेतात पाणी लागून राहिल्याने. कांदा जमिनीतच कुजून गेला होता. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा लागवड करून कांदा पिकविला आहे. आता पुन्हा कांदा काढणीच्या वेळीच अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ओला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला तर तो कवडीमोल दराने खरेदी केला जात असल्याने शेतकरी आणखीन आर्थिकदृष्ट्या खचला आहे.

दरम्यान माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बापू कवडे या शेतकऱ्याची कांदा पावती ट्विट करून केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारचे आता १३ वे घालावे का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

नवीन लाल कांद्याची हंगामातील पहिल्या टप्यातील आवक सुरू झालेली असतानाच नवीन लाल कांद्याला अवेळी पावसाचा फटका बसला आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांद्याच्या प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. नवीन कांद्याचा हंगाम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. सध्या घाऊक बाजारात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे.

बुधवारी (१ डिसेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लागवड चांगली झाली होती. मात्र, कांदा काढणीस आलेला असताना मुसळधार पाऊस झाला आणि कांदा भिजला. भिजलेल्या कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात नवीन लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #RajuShetty #angry #farmers #grievances #viralreceipt #onion #sale #Solapur, #सोलापूर #कांदाविक्री #पावती #व्हायरल #शेतकरी #मांडली #व्यथा #राजूशेट्टी #संतप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतात ओमिक्रॉन रुग्णाच्या संपर्कात आलेले 5 जण पॉझिटिव्ह
Next Article राज्यात आतापर्यंत 9 हजार एसटी कर्मचारी निलंबित

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?