नवी दिल्ली, 7 जुलै (हिं.स.)
विराट
कोहलीचा पुतण्या आर्यवीर कोहली क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे. आर्यवीरची
दिल्ली प्रीमियर लीग २०२५ साठी निवड करण्या आली आहे. त्याला DPL च्या लिलावात खरेदी करण्यात आले आहे.
आर्यवीर कोहलीला १ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. विराट कोहलीच्या
पुतण्याला साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघात स्थान देण्यात आले आहे.
विराट
कोहलीचा पुतण्या आर्यवीर कोहली फक्त १५ वर्षांचा आहे. आर्यवीरचे वडील विकास कोहली
हे विराटचे मोठे भाऊ आहेत. आर्यवीर हा लेग-स्पिनर अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. आणि तो
राजकुमार शर्मा यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे.
ज्यांच्याकडून विराट कोहलीने
त्याच्या बालपणी क्रिकेट शिकले होते. आता आर्यवीर डीपीएल २०२५ मध्ये साउथ दिल्ली
सुपरस्टार्सकडून खेळताना दिसणार आहे.
सिमरजीत
सिंग, नितीश राणा, दिग्वेश राठी आणि नवदीप सैनी हे यावेळी डीपीएल
२०२५ चे सर्वात महागडे क्रिकेटपटू ठरले आहेत. तर दुसरीकडे दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या
दोन्ही मुलांनी लिलावात आपले नाव नोंदवले होते. वीरेंद्र सेहवागची दोन्ही मुले
दिल्लीकडून अंडर-१९ क्रिकेट खेळले आहेत. वेदांत सेहवागचे नाव सुरुवातीला
लिलावासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यात रस दाखवला
नाही. शेवटी वेदांत लिलावात विकला गेला नाही. काही मिनिटांनंतर आर्यवीर सेहवागचे नाव समोर आले. त्याला
सेंट्रल दिल्ली किंग्जने ८ लाख रुपयांना विकत घेतले.
