Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विशाल फटेची पोलिस कोठडी संपली; अयशस्वी तपासाचे खापर कोणावर फुटणार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

विशाल फटेची पोलिस कोठडी संपली; अयशस्वी तपासाचे खापर कोणावर फुटणार ?

Surajya Digital
Last updated: 2022/02/02 at 11:10 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणुकीमधील विशाल फटेची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. त्याची आता 14 दिवसांच्या न्यायलयीन कोठडीत रवानगी केली.
लोकांकडून घेतलेले 25 कोटी कोठे गेले, याचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने आता गुंतवणूकदार उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता अयशस्वी तपासाचे खापर कोणावर फुटणार ? याबाबत विचारणा केली जात आहे.

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून विशाल फटेने लोकांकडून गोळा केलेल्या 25 कोटी रुपयांचे काय झाले? याचा शोध लावण्यात आलेल्या अपयश आलेल्या ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या मागणीनुसार  सत्र न्यायालयाने विशाल फटे यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यामुळे विशाल फटे प्रकरणाच्या पोलिस तपासाचा पहिला अध्याय आज संपला आहे.

गेल्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत जे लोकांना अगोदरच माहिती होते, त्यापेक्षा वेगळे काही पोलिस शोधू शकले नाहीत. त्यामुळे फटे प्रकरणातील तपासात आलेल्या अपयशाचे खापर कोणावर फुटणार, याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आपली गुंतवणूक परत मिळविण्यासाठी आणि फटे प्रकरणात सखोल, नि:ष्पक्ष तपास होण्यासाठी गुंतवणूकदार उच्च न्यायालयात जाणार आहेत.

Vishal Fateh’s police cell is over; Who will be blamed for the failed investigation? Stock market

The investor will go to the High Court

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

13 जानेवारी रोजी फटे कुटुंबियांविरोधात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील प्राथमिक
रक्कम 5 कोटी 63 लाखावरुन आता 25 कोटीच्या घरात पोहचली आहे. मात्र फटेकडून अटक होताना जप्त करण्यात आलेल्या 1 लाख 68 हजारापेक्षा अधिक रक्कम पोलिसांना जप्त करता आलेली नाही. फटेच्या संपत्तीची जी माहिती सर्वज्ञात आहे. त्याचीच माहिती सध्या तपासात संकलित झाली आहे.

विशाल फटेने अटकेपूर्वी केलेल्या व्हिडीओमध्ये आणि फिर्यादीमध्ये अनेक सहकार्‍यांचा आणि रकमा हस्तांतरीत केल्याचा उल्लेख होवूनही पोलिसांनी अद्याप इतर कोणाकडूनही फटेने दिलेली रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केलेला नाही. सहअरोपींपैकी वडील अंबादास व भाऊ वैभव यांना मिळालेल्या पाच दिवसाच्या पोलिस कोठडीतही त्यांच्याकडून उपयुक्त माहिती पोलिसांना मिळवता आली नाही. त्यामुळे गेल्या 17 दिवसांत पोलिसांनी नेमकं केलं काय? असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडला आहे.

विशाल फटेकडून अद्यापपर्यंत प्राप्त झालेली रक्कम आणि दागिन्याची किंमत अत्यंत किरकोळ आहे. त्याच्या जंगम आणि चल मालमत्तेतूनही फारशी काही भरपाई होणार नाही. त्यामुळे त्याने आजपर्यंत हस्तांतरीत केलेल्या रकमांची वसुली होणे आवश्यक आहे. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत त्या दिशेने पावले टाकलेली नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा धूसर होत आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #VishalFateh's #policecell #blamed #stockmarket #failed #investigation, #विशालफटे #पोलिसकोठडी #अयशस्वी #तपास #खापर #स्टॉकमार्केट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोळेगावच्या तरुणावर वेळापूरमध्ये फायरींग, सुदैवाने तरुण वाचला
Next Article भावपूर्ण श्रद्धांजली ! रमेश देव काळाच्या पडद्याआड

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?