Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विठुमाऊलीचे दर्शन लांबले, माघी वारी रद्द, दशमी – एकादशीला दर्शन बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

विठुमाऊलीचे दर्शन लांबले, माघी वारी रद्द, दशमी – एकादशीला दर्शन बंद

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 6:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर : कोरोनाचे सावट अद्यापही संपले नाही. बरोबर कोरोनाची लस अनेकांना देणे बाकी आहे. यामुळे माघी यात्रा नियम व अटीनुसार होणार आहे. मात्र दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.

नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या पहिल्या यात्रेच्या मार्गातही कोरोनाचे काटे असल्याचं पाहायला मिळत होतं. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळं माघी यात्रेवरही अनिश्चिचिततेचे सावट होतं अखेर ही वारी रद्द करण्याचाच निर्णय घेण्यात आला.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे मागील साधारण वर्षभरापासून जगण्याचीच परिभाषा बदलली. वारकरी संप्रदारायासाठीही हे संपूर्ण वर्ष काही सोपं गेलं नाही. सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर 3 वर्षातून येणार अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सह. अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

नव्या वर्षात म्हणजेच 2021 च्या सुरुवातीला येऊ घातलेली वारकरी संप्रदायाची पहिली यात्रा पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर 22 आणि 23 फेब्रुवारीला पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. चार प्रमुख वाऱ्यांपैकी एक असणाऱ्या माघ वारीच्याच वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर मंदिर संस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतची माहिती दिली. शासनाने २८ फेब्रुवारी २०२१ तारखे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे परंपरेचे नियम होणार आहे. मंदिराच्या बाहेरचा विषयासंदर्भात शासन निर्णय घेईल. असे औसेकर महाराज यांनी सांगितले.

एका बाजूला कोरोनावरील लसीकरणाला देशभर सुरुवात झाली असताना अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यातही लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यानच वारकरी संप्रदायाची माघी यात्रा 23 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या नियमानुसार कोणत्याही यात्रा जत्रा भरण्यास परवानगी नसल्याने या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #विठुमाऊली #दर्शनलांबले #माघीवारी #रद्द #दशमी #एकादशीला #दर्शनबंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाझीपूर बॉर्डरवर घेतली शेतकऱ्यांची भेट, कोण काय म्हटले ?
Next Article छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवणा-या शार्जीलवर करा कठोर कारवाई

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?