Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी विश्व वारकरी सेनेचा आंदोलनाचा इशारा; वंचितचे आंबेडकर करणार नेतृत्व
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

श्री विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी विश्व वारकरी सेनेचा आंदोलनाचा इशारा; वंचितचे आंबेडकर करणार नेतृत्व

Surajya Digital
Last updated: 2020/08/22 at 11:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. अगदी गरीबापासून तर मध्यमवर्गीयनासुद्धा फटका बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.

गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.

लॉकडाउनमुळे विठ्ठल मंदिर 31 ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे 2 लाख वारकरी येतील असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. साधुसंतांची जी मागणी आहे ती सरकारने मान्य करायला हवी.  पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत. मी देखील तुमच्या सोबत आंदोलनाला उतरणार, असा शब्द मी त्यांना दिला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

* सोमवारी होणार बैठक

सोमवारी (24 अॉगस्ट) या प्रश्नावर जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे. सध्या पंढरपूरमध्ये दोन हजाराहून जादा कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे 24 ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ बनणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #श्रीविठ्ठलमंदिर #विश्ववारकरिसेना #वंचित #आंबेडकर #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भुसारे परिवारातील भावाची व मामाची भूमिका बाबाभाई पठाणने बजावली; दिसली मानवता आणि बंधुभाव
Next Article दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचे उघड; पाकिस्तानने दिली पहिल्यादाच कबुली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?