Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: व्होडोफोन – आयडियाचे कर्मचारी धडाधड नोकरी सोडू लागले, कंपनी आली रडकुंडीला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

व्होडोफोन – आयडियाचे कर्मचारी धडाधड नोकरी सोडू लागले, कंपनी आली रडकुंडीला

Surajya Digital
Last updated: 2020/12/09 at 10:47 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली होती. अनेक कंपन्या आताही करत आहेत. तर काही कंपन्या रिक्त जागांवर पुन्हा भरती करत आहेत. यामुळे मोठ्या संधी पुन्हा उपलब्ध होत आहेत. अशातच कर्मचारी ही संधी पाहून सोडून जाऊ नयेत म्हणून भारतातील एका बड्या टेलिकॉम कंपनीने कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून जास्तीचा पगार ऑफर केला आहे.

व्होडाफोन आयडियामध्ये कर्मचारी सोडून जाऊ लागले आहेत. दुसरीकडे संधी मिळू लागल्याने वरिष्ठ पदांवरील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असेलेले अधिकारीही सोडण्याच्या तयारीत आहेत. यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीने या कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी नोव्हेंबरमध्ये एक्स्ट्रा सॅलरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एवढेच नाही तर कंपनीने मार्केटिंग डायरेक्टर अवनीश खोसला यांना प्रमोशन देऊन कंपनीने मुख्य मार्केटिंग अधिकारी बनविले आहे. ही पोझिशन गेल्या दोन वर्षांपासून रिक्त होती.  जादा सॅलरी देताना कंपनीने एक अट ठेवली आहे, ती म्हणजे जे या योजनेचा लाभ घेतील त्यांनी 31 मार्च 2021 पर्यंत कंपनी सोडायची नाही. जर कोणता कर्मचारी असे करू शकला नाही, त्याच्या फायनल सेटलमेंटमधून हा जादा दिलेला पगार कापला जाणार आहे.

व्होडाफोन आयडिया सध्या मोठ्या संकटातून जात आहे. कंपनीवर एजीआरची थकबाकी खूपच आहे. याशिवाय कंपनीचे नेटवर्क आता पहिल्यासारखे ताकदवान राहिलेले नाही. जिओच्या स्पर्धेमुळे कंपनीचे ग्राहक सोडून जाऊ लागले आहेत. त्यांना थोपविणे कंपनीच्या हातात नसताना निदान कर्मचारी तरी हाताशी रहावेत, अशा प्रयत्नात कंपनी आहे. कंपनी सतत मोठा फंड गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या काही काळापासून कंपनीला अनेक मोठमोठे अधिकारी सोडचिठ्ठी देत आहेत.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #व्होडोफोन #आयडियाचे #कर्मचारी #धडाधड #नोकरी #सोडूलागले #कंपनी #रडकुंडीला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खुशखबर ! राज्यात 6 हजार शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे पदभरती
Next Article खळबळजनक दावा : पृथ्वीवर एलियन्स, मंगळावर गुप्त अड्डा, अमेरिकेला सर्व माहितीय

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?