Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मतदान केंद्रांवर ‘नो प्रेशर’…‘नो धटिंग’ सिर्फ ओन्ली ‘व्होटिंग..!’ सीसीटीव्हीच्या निगराणीखाली 8 मतदान केंद्रांवर आज मतदान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मतदान केंद्रांवर ‘नो प्रेशर’…‘नो धटिंग’ सिर्फ ओन्ली ‘व्होटिंग..!’ सीसीटीव्हीच्या निगराणीखाली 8 मतदान केंद्रांवर आज मतदान

admin
Last updated: 2025/04/27 at 2:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालकपदाच्या निवडीसाठी आज रविवार (ता.27) मतदान होत आहे. मुख्यत्वे, सोलापूर शहरासह अन्य अशा आठ ठिकाणी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पहिल्यांदाच मतदान प्रक्रिया राबत आहे. अत्यंत पारदर्शी आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडण्याच्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. सीसीटीव्ही आणि पोलिसांची करडी नजर यामुळे मतदान केंद्रांवर अजिबात मतदारांवर दबाव आणणे, मतदार केंद्र ताब्यात घेण्यासाठी धटिंग करणे हे प्रकार अजिबात होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

साधारण दीड वर्षांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक रखडली होती.पणन विभागाच्या आदेशानुसार निवडणूक प्रकियेस गेल्या एक महिन्यापासून सुरू झाली आहे. आज मतदान होणार आहे. निवडणूक साठी 71 उमेदवार रिंगणात असून सोलापूर शहरात 1,तर उत्तर व दक्षिण मधील 7 मतदान केंद्रावर सकाळी 8 वा पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.ही मतदान प्रकिया पार पाडण्यासाठी 140 कर्मचारी, पोलीस यंत्रणा कार्यनवीत करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून यावर बारीक लक्ष उपनिबंधक किरण गायकवाड ठेवणार आहेत. 18 संचालक मंडळ साठी उत्तर व दक्षिण मधून सह सोसायटी-1895, ग्रामपंचायत-1176, व्यापारी- 1275, हमाल-तोलार-1084 असे एकूण 5421 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतमोजणी केंद्रावर ‘यांना’च मिळणार प्रवेश
सोमवार (ता.28) रोजी सकाळी 8 वा पासून मोठ्या पोलीस बंदोबस्ता मध्ये सिद्धेश्‍वर साखर कारखाना परिसरातील स्व. आपासाहेब काडादी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे यावेळी उमेदवार अथवा प्रतिनिधीस परवानगी दिली जाणार आहे.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोण घेणार अंगावर गुलाल? मतदारराजाचा कौल आज होणार मतपेटीत बंद
Next Article WAVES -2025 परिषद

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?