पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मनसेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी राज यांनी ‘ईडी’ च्या कारवाईवर तोफ डागत भाजपवर निशाणा साधला. ED सारखी सरकारी यंत्रणा ही मोदी सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय, असं राज म्हणाले. तसेच, माझ्यामागे ‘ED’ लावली तर मी CD लावेन, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. त्यामुळे मी खडसे कधी सीडी बाहेर काढतात, याची वाट पाहतोय, असंही राज म्हणाले. नेमके काय म्हणाले वाचा पुढे….
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414175227819397120?s=20
माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414116013390528512?s=20
महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414141256330932228?s=20
* आरक्षणावर राज ठाकरेंचा सवाल
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठंय?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला.
जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे. तर अडलं कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असंही राज ठाकरे म्हणाले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414082420245110788?s=20