Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Pimpalpournima सात सेकंद अशी पत्नी नको म्हणत पुरुषांनी केली साजरी पिंपळपौर्णिमा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

Pimpalpournima सात सेकंद अशी पत्नी नको म्हणत पुरुषांनी केली साजरी पिंपळपौर्णिमा

Surajya Digital
Last updated: 2022/06/14 at 10:47 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ २०१२ साली स्थापन झाली ‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’

औरंगाबाद : महिलांनी आज वटपौर्णिमा मोठ्या प्रेमाने साजरी केली. त्याआधी काही पुरूषांनी पिंपळपोर्णिमा साजरी केली. औरंगाबादमधील वाळूज परिसरामधील पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळपोर्णिमा साजरी केली. वाळूजमध्ये पत्नीपीडित पुरुषांनी सात जन्म काय सात सेकंदही ही पत्नी नको असं म्हणत पिंपळाला 108 उलट्या फेऱ्या मारल्यात. दरम्यान, 2017 पासून दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे पुरुष पिंपळपौर्णिमा साजरी करतात. Men Celebrate Pimpalpournima Walunj Aurangabad Munja Pichha

Contents
□ २०१२ साली स्थापन झाली ‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’ □ पाच वर्षांपासून पिंपळपौर्णिमा होतीय साजरी □ समाजासह न्यायव्यवस्थेकडूनही उपेक्षाच □ मुंजाला प्रार्थना, पिच्छा सोडावा

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/561279038883163/

औरंगाबादमधील वाळूंज परिसरामधील पत्नीपीडित पुरुषांनी चक्क पिंपळपोर्णिमा साजरी केलीय. उद्या म्हणजेच मंगळवारी, १४ जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार असतानाच वाळूंजमध्ये पत्नीपीडित पुरुषांनी सात जन्म काय सात सेकंदही ही पत्नी नको असं म्हणत पिंपळाला १०८ उलट्या फेऱ्या मारल्यात.

अनेक वर्षांपासून जे पुरुष पत्नीपासून पीडित आहेत. आपल्याला कोणीही मदत करत नाही. त्यामुळेच अशापद्धतीच्या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून हे पुरुष आपलं म्हणणं समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. २०१२ साली स्थापन झालेल्या ‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला. पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना अशी ओळख या संस्थेमार्फत सांगितली जाते.

□ पाच वर्षांपासून पिंपळपौर्णिमा होतीय साजरी

२०१७ पासून दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे पुरुष पिंपळपौर्णिमा साजरी करतात. वाळुंजमध्ये या संस्थेनं एक आश्रम सुरु केलं आहे. या आश्रमात राज्यभरातील पत्नीपीडित पुरुष वास्तव्यास असल्याचं संस्थेमार्फत सांगितलं जातंय. पत्नीकडून मारहाण होणारे, पत्नीमुळे मानसिक छळ होणारे पुरुष या आश्रमात एकत्र जमून पिंपळपौर्णिमा साजरी करतात.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/560929865584747/

□ समाजासह न्यायव्यवस्थेकडूनही उपेक्षाच

महिलांसाठी अनेक कायदे आहेत. त्यांच्यावरील अत्याचारांना त्यांना वाचा फोडता येते. पोलीस किंवा न्यायालय त्यांना मदत करते. मात्र ज्या पुरुषांना पत्नीकडून वारंवार त्रास होतो, सासरवाडीच्या लोकांकडून त्रास दिला जातो, अशा पुरुषांचं कोणी ऐकून घेत नाही, अशी या आश्रमातील पत्नीपीडित पुरुषांची खंत आहे.

मोठ्या आशेने आम्ही लग्न करतो. नंतर संसारामध्ये भांडणं होतात. ही भांडणं जेव्हा पोलीस स्थानकापर्यंत जातात तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. पोलीस मदत करत नाहीत पण समाजही आम्हाला मदत करताना दिसत नाही. समाजाकडूनही आम्हाला नाकारण्यात आल्यावर न्यायव्यवस्थेकडूनही आम्हाला महिलांप्रमाणे मदत केली जात नाही,” असं या आश्रमातील एका पत्नीपीडित पुरुषाने बोलताना सांगितलं.

□ मुंजाला प्रार्थना, पिच्छा सोडावा

पत्नी आमच्याकडे सुखाने नांदत पण नाही. तसेच नांदली तर सुखाने जगू देत नाही, अशी खंत या पुरुषांनी व्यक्त केलीय. “प्रथा परंपरा पाहिल्या तर असं सांगितलं जातं की वटसावित्री जी होती त्यांनी पत्नीला मरणाच्या दारातून यमराजाकडून परत आणलं होतं. उद्या जाऊन आमच्या पत्नी वटसावित्री साजरी करतील. त्या यमराजाला साकडं घालतील की पुन्हा सात जन्मी त्रास द्यायला हाच पती दे म्हणून.

पण आम्ही सात जन्म काय आता सात सेकंदही अशी पत्नी सहन करु शकत नाही, कारण या वेदना आम्हाला सहन होत नाही,” असं एका पत्नीपीडित पुरुषाने म्हटलंय. पिंपळामध्ये मुंज असतो असं म्हणतात. आम्ही त्या मुंजाला प्रार्थना करतो की आमच्या पत्नीने आमचा पिच्छा सोडावा, असंही येथे पिंपळाला उलट्या फेऱ्या मारणाऱ्या पुरुषांनी सांगितलं.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/561097618901305/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Men #Celebrate #Pimpalpournima #Walunj #Aurangabad #Munja #Pichha, #सातसेकंद #पत्नी #पुरुष #साजरी #पिंपळपौर्णिमा #औरंगाबाद #मुंजा #पिच्छा #वाळुंज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संत तुकारामांची भूमिका महत्त्वाची – नरेंद्र मोदी
Next Article बांधकामाचे मोजमाप सादर करा,  अन्यथा करवाढीला समोरे जा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?