प्रतिनिधी
सोलापूर : टाकळी ते सोलापूर दरम्यानची मुख्य पंपिंग लाईन टाकळी पंपहाऊस जवळ जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्ती कामामुळे शहराचा पाणी पुरवठा दि. ९ एप्रिल २०२५ पासून एक रोटेशनसाठी चार दिवसाआड ऐवजी पाच दिवसाआड करण्यात येणार आहे. सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी ते सोलापूर दरम्यानची मुख्य पंपिंग लाईन टाकळी पंपहाऊस जवळ नादुरुस्त होऊन पाण्याची गळती होत असल्याने दुरुस्तीचे काम सोलापूर महानगरपालिका मार्फत दि. ८ एप्रिल २०२५ रोजी हाती घेण्यात आले आहे.
दुरुस्तीच्या कामास बराच कालावधी लागणार असल्याने तसेच बुधवार दि. ९ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाकडून त्यांच्याकडील देखभाल दुरुस्तीच्या कामाकरीता शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या पंपिंग स्टेशनला विद्युत पुरवठा होणार नाही. या कारणांमुळे सोलापूर शहराचा पाणी पुरवठा दि. ९ एप्रिल २०२५ पासून एक रोटेशनसाठी चार दिवसाआड ऐवजी पाच दिवसाआड करण्यात येणार आहे.
सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होईल. तरी नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे.
—-