Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाण्याच्या मोटारचा शॉक बसून बालकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पाण्याच्या मोटारचा शॉक बसून बालकाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2023/05/09 at 5:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● थेट पोलिसाच्या श्रीमुखात लगावली, दोघांना पोलिस कोठडी, पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना, घडला प्रकार

सोलापूर : पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज लष्कर येथे मंगळवारी (ता. ९) सकाळी घडली. मृताच्या नातेवाईकास नुकसानभरपाई द्यावी, म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. या घटनेस महापालिकेला जबाबदार धरले जात आहे.

 

 

नळाला पाणी कमी दाबानं येत असल्यानं मोटारलावून पाणी घेण्यात येतं. हा बालक मोटार लावलेल्या ठिकाणी आला असताना उघड्या वायरवर त्याचा पाय पडला आणि शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे. मुलाच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली असून अवेळी पाणी सोडणाऱ्या पालिकेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून लहानमुलाचं शव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

 

मयताचे काकाने या घटनेस पूर्णपणे महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले . महापालिकेच ढिसाळ नियोजन आणि वेळेवर, नऊ दिवस पाणी सोडले जाते. कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने पाण्याची मोटार लावावी लागली. संबंधित महापालिका अधिका-यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली.

 

 

शांतराज युवराज तल्लारे ( वय १०, रा. इमानियार चौक, कुंभार गल्ली, लष्कर) असे त्या मुलाचे नाव आहे. नळाला पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे तल्लारे कुटुंबिंयानी पाणी ओढण्यासाठी मोटार लावलेली होती. पाणी भरल्यानंतर मोटारीचे विद्युत कनेक्शन काढण्यासाठी शांतराज याला विजेचा जोरात धक्का बसला.

 

ही घटना कळताच त्याला उपचारासाठी आई वडिलांनी व शेजाऱ्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना कळताच हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी आक्रोश केला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● थेट पोलिसाच्या श्रीमुखात लगावली, दोघांना पोलिस कोठडी, पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना, घडला प्रकार

 

सोलापूर : वाहन चालविण्याचा परवाना मागितला म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजता शहरातील सावरकर चौक येथे घडली आहे.

याबाबत पोलिसांत दाखल झालेल्या
गुन्ह्यानुसार, पोलिस कॉन्स्टेबल विजय कोळवले, शिवाजी आवटे हे शहरातील सावरकर चौक येथे रविवारी (ता. ७) ११ वाजता सरकारी गणवेशात शासकीय काम करत होते. या दरम्यान प्रवीण तानाजी लवटे (वय २५, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर), नितीन तानाजी लवटे (वय २२, रा. महूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना पोलिसांनी वाहन चालवण्याचा परवाना मागितला.

 

मोटारसायकल चालविण्याचा परवाना दाखविण्याच्या कारणावरून दोघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून विजय कोळवले यांना चापट मारली. तसेच शासकीय काम करत असताना हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी केली, अशी फिर्याद दिली आहे. याबाबत त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Child #dies #watermotor #shock #Solapur #Municipal #Corporation #Lashkar, #पाणी #मोटार #शॉक #बालक #मृत्यू #सोलापूर #महापालिका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवारांनी केली चाचपणी, पुन्हा सोलापूर दौरा ‘फिक्स’
Next Article राज्यात जुलै – ऑगस्टमध्ये होणार मेगा शिक्षक भरती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?