Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Monsoon date changed मान्सूनची तारीख बदलली; या दिवशी होणार महाराष्ट्रात दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

Monsoon date changed मान्सूनची तारीख बदलली; या दिवशी होणार महाराष्ट्रात दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/05/28 at 8:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● 60 ऐवजी 40 दिवस पाऊस

मुंबई : महाराष्ट्रात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचे हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. येत्या 7 ते 10 जून रोजी मान्सूनचे आगमन होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. तरी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुर्व मान्सूनच्या सरी बरसत आहेत. हवामान अनुकूल होत असल्याने पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होऊ शकते, अशा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. Monsoon date changed; Weather forecast for Maharashtra will be on this day

 

भारतीय हवामान विभागाने या वर्षी 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भाकित वर्तवले होते. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता मान्सून हा जवळपास चार दिवस उशिरा केरळमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान स्थितीचा अंदाज घेत कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये असे आवाहन केले आहे.

हवामान तज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने, पुढील २-३ दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान यंदा मान्सून लवकर बरसेल अशी शक्याता सांगितली जात होती. मात्र मान्सूनच्या अंदाजाची तारीख चुकलेली आहे. २७ तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

🌧☔पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने,
पुढील २-३ दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
– IMD
👍आज ही पावसाची सिमा अजून उत्तरेकडे सरकली. pic.twitter.com/ifSo1MTCTk

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 27, 2022

 

भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सून दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात नुकताच दाखल झाला आहे. खरं पाहता मान्सून हा दरवर्षी एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. गतवर्षी मान्सून दोन दिवस उशिरा म्हणजेचं तीन जूनला केरळमध्ये दाखल झाला होता.
यंदा मात्र आसनी चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाल्याने मान्सून केरळमध्ये 27 मेला दाखल होणार असल्याचे सांगितले जात होते.

सध्या मुंबईसह राज्यातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरणाची नोंद केली गेली आहे. असा ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण आता मान्सूनची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ५ जूनला मान्सून बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केरळमध्ये अजूनही मान्सूनचे कोणतेही अपटेड समोर आले नसल्याने महाराष्ट्रातला मान्सूनचा अंदाज चुकू शकतो.

दरम्यान, पुढील २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारत, तमिलनाडु, केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता सांगितली जात आहे.

 

● 60 ऐवजी 40 दिवस पाऊस

आता पुन्हा मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने मान्सून हा चार दिवस उशिरा केरळमध्ये दाखल होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून पोचायला उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान तज्ञांच्या मते, पूर्वी मान्सूनचा पाऊस हा 60 दिवस कोसळत असे मात्र आता यामध्ये मोठी घट झाली असून 40 दिवस पावसाचे राहणार आहेत. मात्र पावसाळा हा चांगला राहणार आहे.

 

 

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #Monsoon #date #changed #Weather #forecast #Maharashtra #thisday, #मान्सून #तारीख #बदलली #महाराष्ट्र #दिवशी #महाराष्ट्रात #दाखल #हवामान #अंदाज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा काय संबंध नाही
Next Article सोसायटी निवडणुकीत दाखवली ताकत; सुरेश हसापुरेंमुळे ‘दक्षिण’ मध्ये काँग्रेसला उभारी

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?