Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वेबसाईट ठप्प, पालकांना मनस्ताप अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

वेबसाईट ठप्प, पालकांना मनस्ताप अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा

admin
Last updated: 2025/05/22 at 3:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 22 मे (हिं.स.) इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यभरात बुधवारी २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी व पसंतिक्रम नोंदविणे प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरु होणार होती. मात्र, संकेतस्थळ सकाळपासून बंद असल्याने पहिल्याच दिवशी फज्जा उडाडा. तांत्रिक दुरूस्तीचे काम सुरु असल्याने प्रक्रिया सुरु झालेली नाही. नोंदणीसाठी विद्यार्थी, पालक ताटकळले आहेत. तर प्रक्रिया करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील नेमण्यात आलेले शिक्षकही गोंधळात पडले असून विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ हजार ४२२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला वाणिज्य, विज्ञान या तीन शाखांसाठी एकूण प्रवेश क्षमता १ लाख ८६ हजार ४७५ इतकी आहे.अकोला जिल्ह्यात २६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १३ हजार ९१५, वाणिज्य शाखेत ५ हजार २९५ आणि विज्ञान शाखेत १७ हजार ८०५, अशी एकूण ३७ हजार १५ प्रवेश क्षमता आहे. अमरावती जिल्ह्या तील ३१० कनिष्ठ महाविद्याल यांमध्ये कला शाखेत १८ हजार ६०, वाणिज्य शाखेत ५ हजार ८६० आणि विज्ञान शाखेत १७हजार २६०, अशी एकूण ४१ हजार १८० प्रवेश क्षमता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३४० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कलाशाखेत १८ हजार ३७०, वाणिज्य शाखेत ६ हजार २२० आणि विज्ञान शाखेत २० हजार ५६० अशी एकूण ४५ हजार १५० इतकी प्रवेश क्षमता आहे. वाशीम जिल्ह्यातील १९५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत १० हजार २७०, वाणिज्य शाखेत २ हजार २० आणिविज्ञानशाखेत १० हजार ९९० अशी एकूण २३ हजार २८० इतकी प्रवेश क्षमता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेत २० हजार १२५, वाणिज्य शाखेत ४ हजार ९४५ आणि विज्ञान शाखेत १४ हजार ७८० अशी एकूण ३९ हजार ८५० इतकी प्रवेश क्षमता आहे.

दिवसभर प्रवेश प्रक्रियेत अडथळा

शिक्षण विभागाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. २१ मेपासून २८ मेपर्यंतविद्यार्थ्यांना प्रवेशासाठीप्रत्यक्ष नोंदणीकरता येणार आहे. परंतु, पहिल्याच दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता सुरु होणारी प्रक्रिया काहीवेळ लांबली. संकेतस्थळाचे काम सुरु असून लवकरच सुरु होईल, असा संदेश येत असल्याचेही काही पालक, शिक्षकांनी सांगितले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत केली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
Next Article तामिळनाडू : भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?