Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लग्नाला 2 हजार जणांची गर्दी, शिवसेना नेत्यासह 6 जणांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

लग्नाला 2 हजार जणांची गर्दी, शिवसेना नेत्यासह 6 जणांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2021/08/29 at 2:47 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : पुण्यातील शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लघंन करण्यात आले. लांडे यांच्या मुलाच्या लग्नाला 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी लांडे यांच्यासह 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

देशभरात कोरोना महामारीने हाहा:कार माजवला आहे. राज्यातही कोरोनाने थैमान घातलं आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आटोक्यात आलेली नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू आहे.  अशात कोरोना काळात नियम मोडून मुलाच्या लग्नात 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवली म्हणून नवरदेवाचे वडील,सासरे व मंगल कार्यालय मालक यांच्यासह अन्य 6 जणांवर जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बारव येथे झालेला हा शाही लग्नसोहळा दोन दिवस मोठा चर्चेत होता. अनेक राजकीय मंडळी आजी माजी आमदार, आजी माजी सदस्य या लग्नसोहळ्याला उपस्थिती होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जुन्नर,अकोला,ठाणे येथील आमदार सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे,बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे, चैतन्य उल्हास मिंडे आणि सुधीर नामदेव घिगे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

28 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2 च्या सुमारास मौजे, बारव गावचे हद्दीत कडे जाणाऱ्या रोडवर महालक्ष्मी मंगल कार्यालय इथे हा लग्न सोहळा पार पडला. याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तसेच सध्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. पुण्यात सध्या जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील सदर ठिकाणी देवराम सखाराम लांडे यांनी जमाव जमवून गर्दी केली आहे. म्हणून जुन्नर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव पुढील तपास करत आहेत.

* बाळे येथे फरशीने मारहाण वायरमन जखमी

सोलापूर : बाळे येथील खडक गल्ली जवळ घरातील विद्युत कनेक्शन बंद करायला लावण्याच्या कारणावरून डोक्यात फरशी घातल्याने दत्तात्रेय गोविंदराव छत्रपती (वय ४२) हे वायरमन जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नीलेश दत्तात्रय भोसले आणि महेश भोसले या दोघांनी मारहाण केली. तर आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दिली म्हणून दत्तात्रय छत्रपती याने जड वस्तूने डोक्यात मारल्याने निलेश दत्तात्रय भोसले (वय ३२ रा.खडक गल्ली, बाळे) हा जखमी झाला. या दोन्ही घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #Crowd #people #wedding #crime #6people #ShivSena #leader, #लग्नाला #2हजार #गर्दी #शिवसेना #नेत्यासह #6जणांवर #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सराईत गुन्हेगार रमजान शेख एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द, दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक
Next Article खळबळजनक गौप्यस्फोट, ‘बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता, तेव्हा मी साथ दिली, उद्धव सोबत नव्हता’

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?