Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलीस निरीक्षकाने केले गरीब मुलीचे कन्यादान, पोलीस स्टेशनमध्येच पार पाडला लग्नसोहळा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पोलीस निरीक्षकाने केले गरीब मुलीचे कन्यादान, पोलीस स्टेशनमध्येच पार पाडला लग्नसोहळा

Surajya Digital
Last updated: 2021/09/25 at 10:31 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी मैंदर्गी मधील प्रेमप्रकरणातील एका तरुणाचं आणि तरुणीच लग्न शुक्रवारी ( दि. २४) राञी १०. ३५ वा. मुहूर्तावर लग्न लावून देत कन्यादान देखील केले आहे. यामुळे पोलिसांच्या या पुढाकारामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

वेदमूर्ती धानय्या स्वामी यांच्या विविध मंञोपचाराने विधीवत लग्न लावण्यात आले.शेवटी लाडू वाटप करण्यात आले. काळे यांनी मणी मंगळसूञ, साडी, मुलास पूर्ण आहेर,भांडी स्वखर्चाने खरेदी करून मुलीस स्वतःची मुलगी मानुन लग्न केले.प्रत्येक ठिकाणी कायद्याने शिक्षा न करता सकारात्मक विचारसरणीने एकाचे कुंटुंब उभे राहत असेल तर ते नक्कीच चांगले आहे.

गेल्या सात आठ महिन्यापासुन मिस्त्री काम करणारा सचिन मंजुळकर यांची त्याच गावातील बिगारी काम करणाऱ्या यलव्वा टोणगे हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पण मुलाच्या घरचे आंतरजाती मुळे लग्नास तयार नव्हते .मुलीचे आईवडिल सहा वर्षापूर्वीच वारले आहेत. ती आजीसोबत राहते.आजी पण वार्धक्याने घरीच असते.त्यामुळे मुलगी बिगारी काम करून उदरनिर्वाह चालविते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रेम करणारा सचिन वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करीत होता. गांवक-यांकडून न्याय मिळत नसल्याने तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपली आपबीती पोलीस निरीक्षकांना सांगितले. पोलीस निरीक्षक यांनी मुलाला व नातेवाईक मामा यांना बोलावुन घेतले. समुपदेशन करून स्वतः पोलीस निरीक्षक यांनी कन्यादान करून लग्न लावुन दिले.लग्नाला दोन्ही बाजूने पाहुणे हे पोलिस होते. आपल्या मुलीचे कन्यादान करण्याचे प्रत्येक वडीलांचे स्वप्न असते, हे भाग्य पोलिसांना लाभले आहे. या समाजाभिमुख कार्याबद्दल पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रदीप काळे व सहका-यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी जि. प. सदस्य मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक सद्दाम शेरीकर, पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड,  फौजदार प्रवीण लोकरे,  सुरेश जाधव,अजय भोसले, संजय पांढरे, सुनिल माने, एजाज मुल्ला, अमोघसिद्ध वाघमोडे, केदारनाथ सुतार, महादेव शिंदे, महिला पोलीस चमेली राजमाने, जोस्ना सोनकांबळे व अनेक नागरिक उपस्थित होते.

 

* एसटी आणि ट्रकचा अपघात , ट्रक चालक आणि ५ प्रवासी जखमी 

सोलापूर – विजयपूर महामार्गावरील तेरामैल पेट्रोल पंपाजवळ कर्नाटकची एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने बस मधील ५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला. सर्व जखमींना मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .
अंबिका विठ्ठल ईश्वरकट्टी (वय ३५) त्यांच्या दोन मुली श्रावणी (वय१०) ऋतुजा (वय८) मुलगा शेटप्पा (वय १३) आणि दीर लिंगप्पा लक्ष्मण ईश्वरकट्टी (वय ३५ सर्व रा. कल कर्जाळ ता. अक्कलकोट) असे बस मधील जखमीची नावे आहेत. ट्रकचा चालक उमेश भगवान बनसोडे (वय २४) हा देखील जखमी झाला. या सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ईश्वरकट्टी कुटुंबीय हे टाकळी येथून बस मधुन सोलापूरकडे येत होते तेरामैल जवळ विजयपूरच्या दिशेने जाणारा ट्रक समोरून धडकल्याने हा अपघात घडला. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #policeinspector #performed #bride's #dowry #poorgirl #wedding #ceremony #policestation, #पोलीसनिरीक्षक #गरीबमुलीचे #कन्यादान #पोलीसस्टेशन #लग्नसोहळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गुंजेगावात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीला अटक
Next Article सोलापूर जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के पाऊस, पाच तालुक्यात सरासरी ओलांडली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?