Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्या बुधवारचा सोलापूर शहराचा पाणी पुरवठा उशीरा, कमी दाबाने होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

उद्या बुधवारचा सोलापूर शहराचा पाणी पुरवठा उशीरा, कमी दाबाने होणार

Surajya Digital
Last updated: 2023/05/09 at 10:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 सायबर टेक कंपनीकडून सर्व डाटा हस्तांतरित करणार; महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांची माहिती

सोलापूर : विद्युत वितरण कंपनीकडून मंद्रुप सबस्टेशन येथील दुरुस्ती कामासाठी १० मे रोजी दुपारी 2 तास शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे टाकळी हेड वर्क्स येथून होणारा पाणी उपसा पुरेशा प्रमाणात होणार नसल्याने सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरुन होणारा दि.१० मे २०२३ रोजीचा नियोजित पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे. Solapur city’s water supply tomorrow Wednesday will be late, low pressure frugal appeal

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सोलापूर विभागाकडून १३२ के.व्ही / ३३ के.व्ही मंद्रुप सबस्टेशनहून टाकळी हेड वर्क्सला ३३ के.व्ही उच्च दाबाने विद्युत पुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विनंती नुसार मंद्रुप सबस्टेशन विभागाकडून मंद्रुप सबस्टेशन येथील दुरुस्ती कामासाठी दि.१० मे २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेणेत येणार आहे.

 

त्यामुळे टाकळी हेड वर्क्स येथून होणारा पाणी उपसा दि. १० मे २०२३ रोजी पुरेशा प्रमाणात होणार नसल्याने सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरुन होणारा दि.१० मे २०२३ रोजीचा नियोजीत पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 सायबर टेक कंपनीकडून सर्व डाटा हस्तांतरित करणार; महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांची माहिती

 

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात मिळकतकरांचे सर्वेक्षण सायबर टेक कंपनीकडून करण्यात आले. दरम्यान या मिळकत सर्वेक्षणाला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहे. सायबर टेक कंपनीकडून पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा डाटा हस्तांतरित करण्यात येत असल्याची माहिती महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी मंगळवारी दिली.

 

सोलापूर शहरातील मिळकती करा संदर्भात सायबर टेक कंपनीकडून 2013 -14 साली शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ते सर्वेक्षण 2016- 17 मध्ये पूर्ण झाले. दरम्यान, सर्वेक्षणाला पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे नियमित पंचवार्षिक रिविजन म्हणून शहराचा पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

 

आता सोलापूर महापालिका आणि सायबर टेक कंपनी यांच्यात कोणताही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे सायबर टेक कंपनीकडून सर्व डाटा हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे, असेही पोळ यांनी सांगितले. डाटा हस्तांतरांचे काम संपल्यानंतर बिलिंगचे सर्वर सुरू करण्यात येणार आहे. साधारणतः आठवडाभरात हे सर्वर सुरू होईल असेही पोळ यांनी सांगितले.

 

दरम्यान, सायबर टेक कंपनीचे सर्व बिल अदा करण्यात आले आहे, काही बाकी नसल्याचे उपायुक्त पोळ यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Solapur #city's #watersupply #tomorrow #Wednesday #late #lowpressure #frugal #appeal, #उद्या #बुधवार #सोलापूर #शहर #पाणीपुरवठा #उशीरा #कमी #दाब #काटकसर #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लग्नकार्याला जाताना अक्कलकोटमध्ये पिकअपचा अपघात , एक ठार तर पंधरा जखमी
Next Article चुलत्याचा त्रास, तरुणाची आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील प्रकार

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?