Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यातील १ हजार १३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार १३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर 

Surajya Digital
Last updated: 2021/09/10 at 10:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी एकूण १ हजार १३५ शेतक-यांची लॉटरी पध्दतीने नवीन विहिर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.

कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या शेतक-यांना त्यांच्या मागणीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. त्यानुसार पात्र शेतक-यांना जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत मंजूरी दिलेली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती सभापती अनिल मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचित जातीमधील एकूण १८ नवीन विहिर, विहिर दुरुस्ती कामे ९, वीज जोडणी आकार ३ कामे व विद्युत पंपसंच १५ असे एकूण ४५ शेतक-यांना रक्कम रुपये ५२ लाख ८० हजार रूपयांची मंजूरी देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण ४ नवीन विहिर मागणी केलेल्या शेतक-यांना रक्कम रुपये १० लाख रूपये मंजूरी देण्यात आलेली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनुसूचीत जमातीमधील एक विहिर दुरुस्ती कामांकरीता एकूण ५० लाभार्थी करीता रक्कम रुपये ६३.३० लाख रूपये मंजूरी देणेत आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीमार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत यापूर्वी या सर्व योजनाकरीता एकूण ३६ शेतक-यांना रक्कम रुपये ६९.७० लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे.आज अखेर एकूण ८६ शेतक-यांना रक्कम रुपये १ कोटी ३३ रूपयांची  लाख मंजूरी देण्यात आलेली आहे.

कृषि विभागाकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शेतक-यांना विविध बाबीकरीता लाभ देण्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध असून मंजूरी मिळालेल्या शेतक-यांनी तात्काळ कामे सुरु करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करणेत आले आहे.

या योजने अंतर्गत लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या परंतू अद्याप कागदपत्रे अपलोड न केलेल्या ३४५ शेतक-यांनी आपली कागदपत्रे शासन संकेतस्थळावर अपलोड करावीत. जेणेकरुन जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत त्यांना मंजूरी देणे सोयीचे होईल, असेही धोत्रे यांनी सांगितले. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणा-या अन्य गरजू शेतक-यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Wells #sanctioned #farmers #Solapur #district, #सोलापूर #जिल्ह्यातील #शेतकऱ्यांना #विहिरी #मंजूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील श्वेता सावंत हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
Next Article सोलापुरात १५० केंद्रांवर आज एकाच दिवशी २ लाख कोरोना लसींची मिळणार डोस, पुणे आणि सोलापूरची तुलना नको

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?