खास प्रतिनिधी
सोलापूर : बदलापूर घटनेची पुनरावृत्ती घडलेल्या सोलापुरातील इंग्रजी माध्यमाच्या ‘त्या’ प्रसिद्ध शाळेमधील भयानक घटनेमधील अत्याचारीत चिमुरडीला न्याय मिळण्याच्या पार्श्वभूमीवर, अत्यंत महत्त्वाच्या चौकशी आणि जाब जबाबाचा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. शाळेतील वासनांध शिपाई संशयित फ्रान्सिस पिंटो याला मोठ्या शिक्षकेतून धडा मिळण्यासाठी पर्यायाने सहा महिन्यांच्या लैंगिक अत्याचारातून खूप काही सोसावं आणि भोगावं लागत असलेल्या अवघ्या 5 वर्षाच्या त्या चिमुरडीला न्याय मिळताना मेडिकल रिपोर्ट आणि गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर, देण्यात येणार्या साक्ष या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या भयानक घटनेच्या पार्श्वभूमीवर,अत्याचारित चिमुरडी, तिचे आई-वडिल, शाळेचे प्राचार्य, शिक्षक तसेच सेवक आदींचे जाब जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. विशेष म्हणजे ‘तो मी नव्हेच’ याप्रमाणे शाळेत काही असे घडलेच नाही, असा मोठा कांगावा करीत प्रकरण दडपण्यासाठी अटाकोट प्रयत्न केलेल्या प्राचार्यांने दैनिक ‘सुराज्य’च्या दणक्यानं आपला नूर बदलला आहे. शाळेची बदनामी, बालंट अंगाशी येणं यावर अधिक भर देताना, ‘त्या’ चिमुरडीला न्याय मिळण्याला दुय्यम स्थान देणार्या प्राचार्यांने ‘गुन्हेगाराला शिक्षा ही मिळायलाच हवी, चुकीला माफी नाही’ अशी भूमिका वठवत या पार्श्वभूमीवरच पोलीस तपासाला मदत करणे सुरु केल्याचा बोलबाला आहे.
सहा महिन्यांपासून त्या चिमुरडीचे लैंगिक शोषण करुन तिला शारिरीक आणि मानसिक यातना भोगाव्या लागण्याची शिक्षा दिलेल्या संशयित वासनांध शिपाई फ्रान्सिस पिंटो याने मात्र गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर, कबुली दिली नसल्याची माहिती मिळाली आहे.
आई-वडिलांच्या धाडसाचे कौतुक
समाजामध्ये बेअबु्र होईल, लेकीच्या लग्नाचे, पर्यायापे आयुष्याचे अवघड होईल, म्हणून अत्यचाराच्या घटनांमध्ये बहुतांश मुलींचे आई-वडिल हे पोलिसांत तक्रार दाखल करीत नाहीत. या प्रकारांमुळे आरोपींचे फावते. आरोपी जे काही करायचे ते करुन मोकाट राहतात, अत्याचारांच्या घटनांमुळे बहुतांशपणे हाच प्रकार होतो. मात्र पोटच्या गोळ्यावर अत्यचार झाला, काळजाचा तुकडा वासनेची शिकार झाला,या प्रकरणात संशयित आरोपीला आयुष्याची अद्दल घडलीच पाहिजे, हा विचार पक्का करुन त्या चिमुरडीच्या आई-वडिलांनी मोठ्या धाडसाने संबंधित फ्रान्सिस पिंटो याच्याविरुद्ध थेट तक्रार दिली, लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी हे धाडस केले, त्याबद्दल सोलापूर पोलीस आयुक्तलयाकडील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी आई-वडिलांच्या धाडसाचे कौतुक केले.
वासनांध शिपायाला मोठ्या शिक्षेपर्यंत नेहणारे मजबूत पुरावे
‘त्या’ प्रसिद्ध शाळेतील वासनांध शिपायाला चिमुरडीच्या अत्याचार प्रकरणी मोठी शिक्षा लागेपर्यंतचे मोठे पुरावा पोलीसांकडून गोळा करण्यात आल्याचा बोलबाला आहे.
संबंधित घटनेमधील आरोपी तातडीने हाती लागला. त्यामुळे पुढचे तपासाचे काम लवकर सुरु करता आले.घटनेच्या अनुषंगाने, सर्वांचे जाब जबाब नोंदविण्यात आले आहेत. घटनेचा तपास अंतिम टप्यात आहे. प्रयोग शाळेकडून मेडिकल रिपोर्ट येण्याची वाट बघण्याची गरज नाही, तो पुन्हा कोर्टात सादर करता येतो. दोषारोप पत्र लवकर कोर्टात दाखल करणार आहोत.
: यशवंत गवारी, सहा. पोलीस आयुक्त, सोलापूर
लेकरु खोटं नसतं बोलत,
‘खाकी’वर्दीला त्यामुळेच मोठा विश्वास
एखादी महिला अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेल. खोट-नाटे जबाब देईल. मात्र अत्याचारीत घटनेमधील लेकरु खोटं बोलतं नसतं, त्याला खोटं पचवताही येत नाही, इतकं ते अजून अपरिपक्व असतं. त्यामुळे लेकराच्या सांगण्यावर ‘खाकी’वर्दीला विश्वास वाटतो,असं पोलीस सुत्रांनी सांगितलं.
कोणत्या आई-वडिलांना ‘असं’ करु वाटतं?
पोटच्या लेकराची इज्जत ही प्रत्येक आई-वडिलांसाठी अत्यंत प्यारी असते. काचेच्या भांड्याप्रमाणे त्या इज्जतीला आई-वडिल जपत असतात. काचेला एकदा तडा गेला की संपलं, त्याप्रमाणे पोटच्या लेकराची एकदा आब्रु गेली की संपलं, असं आई-वडिल मानतात. त्यामुळे अत्यचाराचा प्रकार झाला नसताना विनाकारण कोणते आई-बाप पोलिसांत तक्रार देतील? पोलिसांच्या नसत्या चौकशीला कशाला सामोरे जातील, न्यायासाठी पोलीस ठाणे आणि कोर्टाच्या पायर्या झिजवतील? हा मुद्दादेखील सोलापुरातील त्या चिमरुडीच्या प्रकरणी पोलीस सुत्रांनी व्यक्त केला.
पोस्कोसह अॅट्रासिटीचा गुन्हा
घटनेमधील संशयित आरोपी फ्रान्सिस पिंटो याच्यावरील लैंगिक अत्याचाराचा पोस्कोसह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, तपास पूर्ण होत आला असून मजबूत पुरावे जमा झाल्याची चर्चा आहे.