सोलापूर प्रतिनिधी
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकारणातील आरोपी मनीषा मुसळे माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिथे आता तिचा मुक्काम असणार आहे. 5 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर संशयित आरोपी मनीषा मानेला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपासाधिकार्यांनी केली होती. पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्याची तपासअधिकार्यांची न्यायालयात मागणी केली होती. त्यानुसार तिला या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवार (ता.25) संशयित माने हिला न्यायालसमोर हजर करण्यात आले होते.
दरम्यान डॉ.वळसंगकर आत्महत्याप्रकरणाचा तपास सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह त्यांच्या टिमकडून युद्धपातळीवर सुरु असली तरी गृहकलाच्या दिशेने तपासाची दिशा पोलिसांची नसल्याने सोलापूर शहर-जिल्ह्याच्या समाजमनातून पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
सरकारी पक्षाची बाजू ऐकत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायादंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनीषा मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून, हॉस्पिटलमधील 27 कर्मचार्यांनी आरोपी मनीषा मानेे हिच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने, सदर बझार पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून तपास सुरू आहेत. याशिवाय फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, शोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून,
लवकरच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खर्या कारणांचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले. रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले. रात्री 10:20 मिनिटांनी डॉ. वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले.