खास प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूरसह राज्यभरात चर्चेत आलेल्या डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येच्या प्रकरणात त्यांच्याच हॉस्पीटलमधील संशयित प्रशासन अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला बुधवार (ता.23) जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्या. विजयसिंह भंडारी यांनी शुक्रवार ( ता.25) पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फिर्यादीचे वकील प्रशांत नवगिरे, सरकारी वकील अमर डोके आणि चौंकशी अधिकारी सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांचं म्हणणं ऐकून त्यांनी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे शुक्रवारपर्यंत मनीषा मुसळे-माने हिला पोलीस कोठडीमधील पाहुणचार घ्यावा लागेल.
दरम्यान, डॉ.वळसंगकर आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा-मुसळे-माने हिच्या पोलीस कोठडीच्या अनुषंगाने, आरोपीचे वकील नवगिरे, सरकारी वकील डोके आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक लकडे यांनी न्या.भंडारी यांच्यासमोर जोरदार युक्तीवाद केला.तसापात गती आहे, मात्र तपास पूर्ण होण्यासाठी संशयिताच्या पोलीस कोठडीची गरज आहे, या सरकारी पक्षाच्या मागणीसह आरोपीच्या वकिलाचे म्हणणे ऐकून दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मनीषा मुसळे-माने हिला सुनावण्यात आली.
विशेषत्वे, डॉक्टरांच्या आत्महत्येसंबंधी गृहकलाचा मुद्दाच पोलीसांनी दूर्लक्षीत केला आहे. रिमांडमध्ये रिपोर्टमध्ये मुसळे-मानेंच्याच वाढीव पोलीस कोठडीचीच मागणी केली. डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येसंबंधी पोलिसांचा मनिषा मुसळे-मानेंच्या तपासावर केवळ फोकस दिसत आहे. मित्र परिवार, नातेवाईक, हॉस्पिटलमधील आणि प्रामाणिक स्टाफ यांच्या भावनेला हरताळ फासला जात असल्याची चर्चा आहे.
आरोपीचे वकिल नवगिरे म्हणाले,
आशिलास बोलायचं आहे, त्यावर कोर्ट ‘हे’ म्हणालं…
संशयित आरोपी मनिषा मुसळे-माने हिच्याकडून तिचे वकिल ऍड.प्रशांत नवगिरे यांना काही माहिती जाणून घ्यायची होती, त्यासाठी नवगिरे यांनी आशिलास दोन मिनिटे बोलु द्या, अशी न्या.भंडारी यांच्याकडे विनंती केली. त्यावर मा. कोर्टाने तातडीने होकार दिला. पुढच्या काही क्षणात कोर्ट हॉलमध्येच ऍड.नवगिरे यांनी संशयित मनीषा हिच्याकडून काही माहिती जाणून घेतली. त्यानंतर पुढच्या काही वेळातच प्रत्यक्ष युक्तीवाद सुरु झाला.
मनीषा मुलास म्हणाली,
येते रे बाळा…काळजी घ्या !
संशयित आरोपी मनिषा हिच्या पोलीस कोठडीची मुदत आज बुधवारी संपणार होती, या दरम्यान तिला कोर्टापुढे हजर करण्यात आले होते. कोर्टामधील कामकाज संपल्यानंतर कोर्ट हॉलच्या बाहेर तिला पोलीस महिला कर्मचारी घेऊन जात होत्या. यादरम्यान गर्दीतही हॉलमध्ये मनिषा हिच्या मुलाने तिला भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मनिषाने मान हलवत…येते रे बाळा … काळजी घ्या…एवढेच सांगितले आणि ती पुढे पोलीस गाडीच्या दिशेने निघून गेली.
कोर्टात नेमकं काय घडलं?
– डॉ. वळसंगकर आत्महत्येप्रकरणी
संशयित मनीषाबद्दल काय होणार, याच्या उत्सुकतेपोटी गर्दी
– संशयित आरोपी मनीषाबद्दलचा युक्तीवाद
ऐकण्यासाठी महिला वकिलांची विशेष गर्दी
– दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी कोर्ट कामकाज सुरु
– बचाव पक्षातर्फे ऍड. संतोष नवगिरेंचा अभ्यासपूर्ण युक्तीवाद
– साधारण अर्धा तास चालले कोर्ट कामकाज
– न्या. भंडारी यांनी संशयित मनिषा विचारले,
आपणास काय सांगायचं आहे का, त्यावर ती उत्तरली, काही नाही
– संशयित मनीषा हिचा कोर्टात सर्वसामान्य आरोपींसारखे दिसले वर्तन
-प्रतिष्ठित व्यक्ती डॉ. वळसंगकरांची मारेकरी मनीषा आहे तरी कोण,
या उत्सुकतेपोटी तिला पाहण्यासाठी लोकांची कोर्टात गर्दी
– मनीषा हिची दोन मुले,पती महेश यांच्यासह नातेवाई कोर्टात उपस्थित
– मनिषाच्या दोन्ही मुलांकडून निषेध म्हणून काळा रंगाचा पेहराव
संशयित मनीषाच्या चेहर्यावर अपराधीपणाच्या छटा
संशयित मनीषा हिला न्या. विजयसिंह भंडारी यांच्यासमोर पोलिसांकडून उभं करण्यात आलं. त्यावेळी तिची एकूण देहबोली तणावात दिसत होती, तरीपण अपराधीपणाच्या छटादेखील तिच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होत्या.
सरकारी पक्षाने संशयित मनीषाच्या
वाढीव पोलीस कोठडीसाठी उपस्थित केलेले दहा मुद्दे
1) संशयित मनीषा हिच्या विरुद्ध हॉस्पीटलमधील 27 जणांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, चौकशी करुन जाबजबाब नोंदविणे
2) संशयित मनिषा हिने पाठविलेला धमकीचा
ई मेल हस्तगत करुन त्यासंबंधी अधिक तपशील गोळा करणे
3) हॉस्पीटलमध्ये मनिषा हिने आक्षपार्ह कारभार केल्याच्या मिळालेल्या
माहितीनुसार चौकशी करणे
4) मनिषा हिने हॉस्पीटलमध्ये केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर, चौकशी करुन सर्व माहिती संकलित करणे
5) मृत डॉ. वळसंगकरांवर केलेले खोटारडे आणि घाणेरडे आरोप यासंबंधी आरोपीचा हेतू आणि उद्देश पडताळणे
6) मृत डॉ.वळसंगकरांना वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तपास करणे
7) संशयित मनीषा हिच्या हस्ताक्षरांमध्ये असलेले मुळ दस्त हस्तगत करुन तिच्या हस्ताक्षराचे नमुने घेणे
8) संशयित आरोनी मनीषाच्या कृत्यामागे कोणी मदत केली का? तिला मदत करणारे साथीदार शोधणे, त्या अनुषंगिक तपास करणे
9 ) मनीषाने फाडलेल्या माफीनाम्याचे तुकडे कोठे फेकले, ते हस्तगत करुन तपास करणे
10) हॉस्पीटलमध्ये स्वत:च्या मर्जीने फेर बदल करण्यासह स्वत:चे वर्चस्व निर्माण करुन त्या आडून मनीषाने केलेल्या सर्व गैरकृत्यांची तपासणे करणे
संशयित आरोनी मनीषाच्या बाजूने
ऍड. प्रशांत नवगिरे यांच्या युक्तवादीमधील ठळक मुद्दे
– संशयित मनिषाची पोलीस कोठडी मिळविताना
पोलीसांनी सुरुवातीला उपस्थित केलेले तेच ते आठ मुद्दे
– नव्याने पोलीस कोठडी मिळविताना अवघ्या दोन नव्या मुद्यांचा समावेश, पण त्यासाठीही पोलीस कोठडीची नाही गरज
– ई-मेल कॉपी सहज होते उपलब्ध ते कारण वाढीव पोलीस कोठडीसाठी कसे
– संशयिताचे हस्ताक्षर नमुने
घ्यायला कशाला हवी पोलीस कोठडी, आता येथेही घेता येऊ शकतात
– ई-मेल वळसंगकर परिवारातील तिघांना पाठवला,
त्यांच्याकडून कॉपी मिळविता येणे शक्य
– पाठविलेल्या धमकीच्या ई मेलबद्दल
मनीषाने माफीनामा लिहिला होता
– मनिषा हिच्याबद्दल आपुलकी
वळसंगकर परिवाराला होती म्हणूनच तिला 17 एप्रिलला परत बोलावले
– मनिषा हिच्याकडे पैशाचा व्यवहार येत नाही, या व्यवहारासाठी तिथे कॅशिअर वगैरे असतात
– मनिषा हिच्याकडील माहितीबद्दल सुरुवातीची तीन दिवसांची पोलीस कोठडी ठीक, वाढवी कोठडीची गरज नाही
न्या. भंडारी यांनी ‘हे’ आवर्जून विचारले…
घटनेतील संशयित आरोपी मनीषा हिने धमकीच्या अनुषंगाने, जो ई-मेल मृत डॉ. शिरीष वळसंगकरांना पाठिवला होता, तो जप्त करण्यात आला आहे का? हे न्या. विजयसिंह भंडारी यांनी तपास अधिकारी अजित लकडे यांना आवर्जून विचारले, त्यावर ई-मेल जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
रिमांड रिपोर्टमध्ये गृहकलाचा मुद्दाच नव्हता,
संशयाची सुई कोणाकडे फिरण्याला जागाच उरली नाही
डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिला बुधवारी वाढीव पोलीस कोठडी मंजूर करुन घेण्यासाठी कोर्टासमोर पोलिसांनी उभे केले होते. दरम्यान वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी पोलिसांनी जे दहा राऊंड उपस्थित केले, त्यामध्ये गृहकलाचा उल्लेख रिमांड रिपोर्टमध्ये नव्हता. त्यामुळे कोर्टात याबद्दलचा मुद्दा उपस्थित होऊ शकला नाही. मात्र संशयित आरोपी मनीषा माने हिचा पहिल्यापासून मुद्दा आहे की, गृहकलह होता. त्याचा त्रास तिला स्वत:लादेखील होत होता, असे संशयित आरोपीचे वकील ऍड. प्रशांत नवगिरे यांनी माध्यमांपुढे बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केले.
कोट
बुधवारच्या तपासामध्ये आरोपीची अजून दोन दिवस वाढीव पीसी रिमांड अधिक तपासासाठी मंजूर करून घेण्यात आलेली आहेे. हॉस्पिटल मधील सुमारे पाच लोकांचे जबाब घेतले असून अधिक चौकशी तपास चालू आहे. आरोपीला इतर कोणी मदत केली आहे काय? याबाबतही अजून तपास चालू आहे.
– अजित लकडे, तपास अधिकारी
तथा मुख्य पोलीस निरीक्षक, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर
—————-