खास प्रतिनिधी
तुळजापूर सोलापूर : महाराष्ट्र हादरवून सोडणारे ड्रग्ज तस्करी प्रकरण तुळजापुरात उघड होऊन अनेक दिवस झाले, मात्र त्याचे सावट या शहरावर आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यात ‘खाकी’वर्दी अन्टेंशमध्ये आहे. तर ज्यांचे हात या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुंतलेले आहे, ते प्रचंड टेन्शनमध्ये आहेत. ड्रग्ज प्रकरणात शहरातील 200 हून अधिकजणांना पोलिसांनी नोटीसा दिल्यावर हे लोक गायब झाल्याची चर्चा आहे.त्यांच्याबाबतीत चिंता आहे. सुरु असलेल्या गतीशील तपासातून आणखी कोणाची नवे नावे समोर येणार, याबद्दल जेवढे औत्सुक्य आहे, त्या तुलनेत ज्यांचे हात गुंतलेले आहेत, त्यांची धास्तीने झोप उडाली आहे. त्यांना अन्नाचा घास गोड लागेना अशी चर्चा आहे. हे प्रकरण आणखी कोणाच्या अंगाशी शेकणार यावरुन राजकीय विश्वदेखील प्रचंड तणावात असल्याचा बोलबाला आहे.
विशेषत्वे, ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 21 आरोपी फरार आहेत तर 14 आरोपी अटक आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे तुळजापूरमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे तुळजापुरातून शंभर लोक गायब झाल्याची माहिती मिळत आहे. तुळजापूर शहरातील 200 जणांना ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी नोटीसा दिल्यावर हे लोक गायब झाल्याचा बोलबाला आहे.
एक नजर… एकूणच तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर…
तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरण चांगलंच फोफावलं. गेली अडीच वर्षांमध्ये जवळजवळ जवळजवळ दोन अडीच वर्षापासून तुळजापूरमध्ये ड्रग्ज विक्री आणि सेवन हे सुरू असल्याची माहिती आहे. मात्र या ड्रग्ज प्रकरणांमध्ये 14 फेब्रुवारीला पोलिसांनी तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्जची पहिली कारवाई केली. त्यानंतर तुळजापूरमध्ये आत्तापर्यंत 35 आरोपी ड्रग्ज प्रकरणांमध्ये निष्पन्न झाले. या निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये राजकीय पक्षाचे सदस्य असल्याने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
फोटो : ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील
व्हायरल फोटोंमुळेच मोठी खळबळ
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीसोबतचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबर ही या प्रकरणातील आरोपींचे फोटो वायरल झाले. राजकारण आणि ड्रग्जचा बाजाराने तुळजापूरसह सोलापूर पर्याने राज्यात अक्षरशः खळबळ उडाली आहे.
हादरवून टाकणार्या ड्रग्ज प्रकरण फ्लॅशबॅक….
-फेब्रुवारी 2025 मध्ये तामलवाडी येथे ड्रग्सचा साठा जप्त, काही आरोपी अटक
-मुंबई कनेक्शन उघड, मुख्य सूत्रधार महिलेसह आणखी काही जणांना अटक
-आरोपींच्या बँक खात्यावर कोट्यवधींचे व्यवहार आणि सोने जप्त
-फरार आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू, आणखी आरोपींची नावे समोर
-आतापर्यंत 35 आरोपी निष्पन्न, 14 अटकेत, 21 फरार
‘हे’ ड्रग्ज सम्राट आजवर आले समोर….
तुळजापुरात गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा पुजार्यांचा आरोप होता. यात आतापर्यंत 35 जण आरोपी असून तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली.त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 3 जणांना 16 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर