अमरावती, २८ ऑगस्ट. शहराच्या मध्यवर्ती राजकमल चौकातील रेल्वे उड्डाणपुलावर प्रशासनाचा कारभार चक्क गोंधळलेला दिसतो. काही दिवसांपूर्वी फक्त जड वाहनांना बंदी घातली, नंतर दुचाकी, चारचाकी आणि आता तर पादचारीसुद्धा बंद! अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
भारतीय यांचा जोरदार सवाल
“पुल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो असे जर प्रशासनाला वाटत असेल, तर शेकडो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची जबाबदारी कोण घेणार? पादचारीपेक्षा कित्येक पट जास्त कंपन रेल्वेमुळे निर्माण होतात. मग याकडे डोळेझाक का?”
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न टाळाटाळीत चालू ठेवणं हे प्रशासनाचं निष्काळजीपणा आहे, अशी टीका करत तुषार भारतीय यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन पुलाची खरी माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे.
