सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)।
भाजप महायुती सरकारचा स्मार्ट मीटर कायदा, अदानींचा फायदा”अशी घोषणा करीत जनतेच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्यांच्या विरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरलेच पाहिजे, असे प्रतिपादन खा प्रणिती शिंदे यांनी केले. खा शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी व नजीक पिंपरी या गावांचा दौरा केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
खा प्रणिती शिंदे यांनी भांबेवाडी व नजीक पिंपरी गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांच्या व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उजनीच्या पाण्याने नजीकपिंपरी तील तलाव भरून घेणे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वाढविणे तसेच इतर अपूर्ण कामे, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार असल्याचे खा शिंदे यांनी यावेळी सांगीतले. ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.