Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुहेरी सुवर्ण विजेत्या महाराष्ट्र खो खो संघाचे सोलापूर रेल्वे स्टेशनवर स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

दुहेरी सुवर्ण विजेत्या महाराष्ट्र खो खो संघाचे सोलापूर रेल्वे स्टेशनवर स्वागत

Surajya Digital
Last updated: 2021/09/29 at 9:39 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : भुवनेश्वर (ओडीसा) येथे झालेल्या कुमार व कुमारी राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्ण पदक पकविल्याबद्दल त्याचे सोलापूर रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले.

दोन्ही संघातील खेळाडूंचे आणि त्यांचे मार्गदर्शक राजेंद्र साप्ते, सचिन चव्हाण, सोमनाथ बनसोडे, व्यवस्थापक अजितकुमार संगवे व सालेहा शेख, फिजिओ डॉक्टर किरण वाघ आणि राज्य खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सोलापूर जिल्हा खो खो संघटनेचे अध्यक्ष महेश गादेकर, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, खजीनदार श्रीरंग बनसाेडे,उत्कर्ष क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र नाशिककर आदींनी त्यांचे स्वागत केले.

* आता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत; बँक पण सात बारा काढू शकतील

पुणे : नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते  महसूल दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते.

डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि महसूल,नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नविन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून करण्यात आला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी, ‘सात बारा काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल. बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण सात बारा काढू शकतील. त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील. खोट्या नोंदी करता येणार नाही. फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अडचणी आल्या तर आम्हाला समजलं पाहिजे. दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते सोडवू,’ थोरातांनी नमूद केलं.

नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच बरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. १ ऑगस्टपासून नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा करुन देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्यावतीने सातबारा सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे, असे देखील थोरात यांनी नमूद केलं.

‘ई पीक पाहणी सुद्धा सुरू आहे. स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत. तलाठी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. काही तालुक्यांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळतोय. टाटा ट्रस्टची मदत मिळत आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे पिकांची लागवड कळणार आहे. विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील मिळणार आहे,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #Welcome #Double #GoldWinner #Maharashtra #KhoKho #team #Solapur #RailwayStation, #दुहेरी #सुवर्णविजेत्या #महाराष्ट्र #खोखोसंघ #सोलापूररेल्वेस्टेशन #स्वागत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर भाजपा पदाधिका-यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घेतली राज्यपालांकडे धाव
Next Article सोलापुरातील दुःखद घटना; पतीचे निधन होताच तासाभरात पत्नीची रेल्वेखाली आत्महत्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?