मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माघारी घेतला आहे. तेच अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले. Sharad Pawar is the president of NCP; Resigned and withdrawn, political selection committee had received the signal only yesterday अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी माझी जबाबदारीतून मुक्त घेण्याची इच्छा होती, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा हा शरद पवार यांनी मागे घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करुन मी माझा राजीनामा मागे घेतो. मात्र मला या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे, त्यासाठी पक्षाला उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवा. त्यामुळे पक्षात काही संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भातील ठराव मांडण्यात आला आहे. परंतु पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. त्यामुळे पवारच पक्षाचे अध्यक्ष राहतील असे समजत आहे. दरम्यान, जो निर्णय समिती घेईल तो मान्य असेल असे पवारांनी म्हटले होते. त्यानुसार शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. सायंकाळी पाच वाजता शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी मुंबईतील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला होता. मात्र त्यानंतर निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळाले.
https://twitter.com/ANI/status/1654460679393517572?t=9wC9QW2fowwTMaWquq8Nhg&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://twitter.com/ANI/status/1654464208405422085?t=dgdqrZe5RtamH-t1qyDchA&s=19
मुंबईतल्या वाय. बी. सेंटरमध्ये शरद पवार हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार म्हटल्यावर या सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव सुरु केला आहे. कार्यकर्ते वाय.बी. सेंटरबाहेर नाचत होते. ढोल-ताशांचा गजर सुरु होता. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेणार, हे जवळपास स्पष्ट झाले होते.
शरद पवार यांचे माघारीचे संकेत कालच मिळाले होते. पक्षाच्या भवितव्यासाठी मी निर्णय घेतला. नवं नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने मी संबंधित निर्णयापर्यंत पोहोचलो. पण माझ्या घोषणेनंतर पक्षातल्या सगळ्या सहकाऱ्यांची तीव्र भावना आहे. तुमच्या भावनांचा आदर करुन मी येत्या २ दिवसांत अंतिम निर्णय घेईन. तुमच्या भावना दुर्लक्षित होणार नाही, याची खरबरदारी घेईन. त्याचवेळी तुम्हाला २ दिवसांनी असं पायऱ्यांवर आंदोलनाला बसावं लागणार नाही, असं सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माघारीचे संकेत देऊन पुन्हा अध्यक्षपद स्वीकारेन, असंच अप्रत्यक्षरित्या सांगितल्याचं बोललं जातंय.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राज्यभरातील युवक, युवतींच्या पदाधिकारी वाय. बी. चव्हाण येथे आंदोलनाला बसले होते. शरद पवार यांनी आपला निर्णय माघारी घ्यावा, यासाठी ते मनधरणी करत होते. काल गुरुवारी त्याच पदाधिकाऱ्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझ्या निर्णयाचा फेरविचार करुन सहकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेईन, असं सांगितलं होते.