पालकमंत्री जयकुमार गोरे प्रकरणाला लागले वेगळे वळण
सब हेडिंग
– खंडणीपैकी कोटीभर रुपये स्विकारताना सातार्यातून अटक
– स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा शहर पोलिसांकडून कारवाई
– सापळा रचून पद्धतशीर केला करेक्ट कार्यक्रम
– वकिलाच्या घरी खंडणी स्विकारताना महिला जेरबंबद
प्रतिनिधी
सातारा
राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणार्या संबंधित महिलेला सातारा पोलिसांनी शुक्रवारी (ता.21) सकाळी अटक केली. खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी ही कारवाई केली. अश्लील फोटो पाठवल्याचे प्रकरण मिटवण्यासाठी या महिलेने गोरे यांच्याकडे 3 कोटींची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तर मागितलेल्या खंडणीपैकी एक कोटी रुपये स्वीकारताना या महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सातारा शहर पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणावरून विरोधकांनी मंत्री गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर संबंधित महिलेने गोरे यांच्यावर आरोप करत राज भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र, या प्रकरणात 2019 मध्ये मंत्री गोरे यांची न्यायालयाने मुक्तता केली आहे. तरीही याप्रकरणी आंदोलन करणार असल्याचे संबंधित महिलेच्या नावाचे पत्र पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी व संबंधित महिलेचाही पत्त्यावर पाठवण्यात आले होते.
त्यावरून हे प्रकरण पुन्हा तापले होते. यावरून विधानसभेत गोरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण सुरू असतानाच पत्रकार तुषार खरात यांना वडूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अट्रॉसिटी व जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. खरात यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे एक कोटी रुपये घेण्यासाठी संबंधित महिलेने शिंदे यांना तिच्या वकिलांच्या सातारा येथील कार्यालयात बोलावले होते. याबाबतची माहिती शिंदे व मंत्री गोरे यांच्याकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि महिलेला एक कोटी रुपये स्वीकारताना अटक केली.
पत्रकार खरात नंतर खंडणीप्रकरणात गुंतली महिला
शिवाय खरात यांच्यावरही दहिवडी पोलिस ठाण्यात मंत्री गोरे यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. खरात प्रकरण सुरू असतानाच शुक्रवारी (ता.21) सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने व शहर पोलिसांनी सातार्यात संयुक्त कारवाई करत अश्लील फोटो पाठवण्याचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेला खंडणी घेतल्या प्रकरणी अटक केली.
कॉंग्रेसचे कार्यकर्ते विराज शिंदेंची मध्यस्ती
दरम्यान, पोलिसांनी महिलेला का अटक केली याबाबतची माहिती सांगितली. ते म्हणाले, अश्लील फोटोचे प्रकरण मिटवण्यासाठी संबंधित महिलेने वाई येथील यांच्याकडे तीन कोटी रुपये जयकुमार गोरे यांनी द्यावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्यात बोलणी होऊन सुरुवातीला एक कोटी रुपये द्यायचे ठरले.
आयडी फोटो रोहित पवार
आमदार रोहित पवार आक्रमक
म्हणाले, त्या महिलेकडे असं काय होतं की 1 कोटी द्यावे लागले?
.जयकुमार गोरे या प्रकरणात वस्तूस्थिती तपासली पाहिजे. 3 कोटी आकडा मोठा आहे, 1 कोटी हादेखील आकडा मोठा आहे. 1 कोटी कशाला दिले? का द्यावे लागले? हे पैसे कोठून आणले? धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात तर योग्य पद्धतीने करता आलं असतं. पैसे का दिले?गोरे साहेब आणि त्या महिलेत करार झाला होता. कोर्टाने काय ताशेरे ओढलेत? आमदार आणि नेते यांच्यावरील गुन्ह्यांचा अभ्यास केला तेव्हा भाजपच्या 54 लोकांवर आरोप आहेत, असा खुलासा रोहित पवार यांनी केला.