चंद्रपूर, 12 मे (हिं.स.)।
मुल तालुक्यातील भादुर्ली येथील एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी समोर आली.
मुल तालुक्यातील भादुर्ली येथील एक महिला तेंदुपत्ता संकलनासाठी नजीकच्या ताडोबा बफरच्या जंगलात गेली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत.