सोलापूर : कोरोना आजाराला कंटाळून निर्मला अनिल गायकवाड (वय ५० वर्षे , रा. जेऊर ता. करमाळा) यांनी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शनिवारी (ता.१९) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात https://t.co/Tm4NMrRVry
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
धाप लागण्याच्या त्रासाने दाखल केल्यानंतर तब्येतीमध्ये सुधारणा होत नसताना झालेल्या असाह्य वेदनामुळे निर्मला यांनी पहाटे साडे तीन वाजण्याच्या पुर्वी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील कोव्हीड वाँर्डमध्ये खिडकीच्या लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसुन आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महिलेला कोविडमध्ये गंभीर असल्याने तिला दुसरीकडे पाठवण्याबाबत सांगण्यात आले होते, नेण्याआधीच तिने आत्महत्या केली. कोरोनामधून अनेकजण कमी वेळेत बरे झाले असताना या महिलेने घाबरुन आत्महत्येचे पाऊल उचलले. यामुळे रुग्णालयात हळहळ व्यक्त होत आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406559923744362496?s=20
मागील सात दिवसापासून निर्मला गायकवाड या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोविडबाबत उपचार घेत होत्या. त्यांचा एच आर सीटी स्कोर हा गंभीर असा २२ होता. त्यामुळे करमाळा उपजिल्हा रुग्णालयाने सदर रुग्णाला सोलापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406279963343351816?s=20