Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शब्दातून अनेकदा व्यक्त झाले प्रेम, आता चक्क ‘देवेंद्र’ नावाचा ‘टॅटू’च गोंदला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शब्दातून अनेकदा व्यक्त झाले प्रेम, आता चक्क ‘देवेंद्र’ नावाचा ‘टॅटू’च गोंदला

Surajya Digital
Last updated: 2021/08/04 at 10:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपली वेगळी वाट धरली. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तर, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नरेंद्र पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीही पुढाकार घेऊन सभा आणि बैठकांना उपस्थिती लावत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले. त्यानंतर, त्यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदलाय.

”जे पोटात तेच ओठात असणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील एकमेव नेते आहेत. त्यांची कार्यपद्धती अन् कर्तुत्वाचे आपण फॅन झालोय,” असे नरेंद्र पाटील यांनी हा टॅटू गोंदल्यानंतर म्हटलं. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम पुन्हा जगजाहीर झालंय.  त्यांनी आपण हे नाव ह्रदयावरच गोंदवणार होतो असेही आवर्जून सांगितले. देवेंद्र फडणवीसांना हे कळाल्यावर रागावल्याचेही सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदलाय. गोंदवून आठवडा झाला असला तरी आता ते प्रकर्षाने समोर आल्याने चर्चा होत आहे.

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमिती आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असा दावाही नरेंद्र पाटील यांनी पक्ष सोडताना केला होता.

नरेंद्र पाटील हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपामध्ये आले होते. मात्र २०१९ मध्ये साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून हे पद काढून घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #Love #expressed #words #only #tattoo #called #Devendra #glued, #शब्दातून #अनेकदा #व्यक्त #प्रेम #चक्क #देवेंद्र #टॅटू #गोंदला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वाळीत टाकून दोन लाखांची मागणी, जातपंचायतीच्या चार पंचांना ठोकल्या बेड्या
Next Article राज्य सरकारने फसवले, प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच – फडणवीस

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?