65 मेंढ्या-बकर्यांच्या झणझणीत फक्कड बेतावर ताव;
कन्हेरगावला ‘वर्ल्ड ऑफ रेकार्ड’ महाजागरण गोंधळ
: गौतमआबा पाटलांच्या अवतनावरुन उठल्या पंगतीच्या पंगती
: तीन हजार क्विंटल मटण अन् हजारो भाकरींवर तुटून पडले मटणप्रेमी
: शक्तीप्रदर्शनाच्या महाजागरण गोंधण्याची माळशिरस तालुक्यात रंगली चर्चा
खास प्रतिनिधी
सोलापूर : ‘या’ ना ‘त्या’ कारणावरुन माळशिरस तालुका नेहमी चर्चेत असतो. सध्या दोन कारणांमुळे हा तालुका चर्चेच्या सध्या लाटेत आहे. अकलूजकर मोहिते-पाटील परिवारातील विवाह सोहळ्याची हायजॅक गर्दी अन् याच तालुक्यातील कन्हेरगावला ‘वर्ल्ड ऑफ रेकार्ड’ होईल असं पार पडलेलं एक दोन नव्हे, तर तब्बल 65 मेंढ्या बकर्यांचे ‘महाजागरण गोंधळ ’. माजी पंचायत समिती सदस्य गौतमआबा पाटील यांनी आपल्या घरी महाजागरण गोंधळ कार्यक्रम ठेवला होता. आप्तेइस्ट, नातेवाईक, सगेसोयरे, हितचिंतक, कन्हेरगावचे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच खास करुन माळशिरस तालुक्यातील पुढारी यांना पाटील यांनी जागरण गोंधळाच्या भोजनाचं अवताण दिलं होतं. अवताणाचा स्विकार करुन या संबंधितांची इथं गर्दी झाली. 65 मेंढ्या अन् बकर्यांच्या झक्कास मटणावर मटण शौकिनांनी यथच्छ ताव मारत तृप्तेची ढेकर दिली. साधारण तीन हजार क्विंटल मटणावर सपाटून बेत आणला.
शक्तीप्रदर्शनाला आगामी निवडणुकीची झालर
माजी पंचायत समिती सदस्य असलेल्या गौतमआबा पाटील यांनी महाजागर गोंधळ कार्यक्रम ठेवून मोठं शक्तीप्रदर्शन घडवलं. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या झालर या कार्यक्रमाला लागली. निवडणुकीच्या निमित्तानेच, त्यांनी एवढा खर्च करुन हजारोंना भोजनातून तृप्त केल्याची चर्चा माळशिरस तालुक्यात रंगली आहे.
भोजनाच्या तृप्ततेबरोबरच करमणूक अन् मनोरंजनाचं समाधानसुद्धा!
गौंतम पाटील यांनी मटणाचा रग्गड बेत करुन मटण शौकीनांना भरपेट जेवण घातलं. मटणावर ताव मारणार्यांनी तृप्ततेची ढेकर दिली. शिवाय महागोंधळ जागरणच्या निमित्ताने वाघ्या मुरळी कम ऑस्र्केस्ट्राबार या कार्यक्रमाचं आयोजनदेखील तिथं होतं. भोजनानंतर शौकीनांची चांगलीच करमणूक आणि मनोरंजनसुद्धा फक्कडंच झालं. रब्बी हंगामाच्या काम करुन शिणलेल्या आणि भागलेल्या मनाला करमणूक आणि मनोजरंजनातून चैतन्य आलं.
महाजागरण गोंधळ कार्यक्रमाची काही खास वैशिष्टये
: महाजागरण गोंधळ कार्यक्रमाची होणार ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकार्ड’मध्ये नोंद
: मांसहारी भोजन न घेणार्यांसाठी शुद्ध शाकाहारी भोजनाचा होता बेत
: मटणाच्या भाजीसाठी तब्बल दहा लाखांचा आणला होता मसाला आणि अन्य सामान
: हजारो लोकांना भोजन घालण्यासाठी 200 कामगारांचे राबले हात
: भाकरी करण्यासाठी 200 कामार महिलांचा होता मेळ
: उन्हाचे दिवस असल्याने चांगली सावली आणि उत्तम पाण्याची होती सोय
– सोशल मीडियासह प्रत्यक्ष पत्रिका देऊन भोजनाचं पाटलांली दिलं होतं आवताण
– महाजागरण गोंधळ कार्यक्रमावेळी सर्व पक्षीय नेते, पुढारी, पदाधिकारी कार्यकर्ते यांची उठली मांदियाळी