Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठ्या गावचा सरपंच नकोरे बाबा : माजी आमदार राजन पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

मोठ्या गावचा सरपंच नकोरे बाबा : माजी आमदार राजन पाटील

Surajya Digital
Last updated: 2023/01/30 at 7:29 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ आमदार यशवंत मानेंनी केला कामांना स्थगिती दिल्याचा शिंदे सरकारवर आरोपस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ आमदार यशवंत मानेंनी केला कामांना स्थगिती दिल्याचा शिंदे सरकारवर आरोप

 

उत्तर सोलापर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे रद्द करण्यात आलेले अधिकार पूर्वीप्रमाणे देण्याची गरज आहे. नाही तर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य नकोरे बाबा अशी म्हणण्याची पाळी येणार आहे, लहान गावचा का होईना सरपंच झालेलं बरं, ही कार्यकर्त्यांची मानसिकता होईल, अशी भीती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली. Nakore Baba, sarpanch of a large village: Former MLA Rajan Patil Yashwant Mane Shinde government suspended the charges

 

वडाळा येथे गावचे सरपंच, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांच्यावतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी, गावडीदारफळ, रानमसले, अकोलेकाटी, मार्डी, डोणगाव, पाकणी, नंदूर समशापूर, कवठे व नरोटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नुतन सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार आमदार यशवंत माने, राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, संयोजक जितेंद्र साठे, अध्यक्ष प्रल्हाद काशीद, प्रकाश चवरे, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा ज्योत्स्ना पाटील, माजी उपसभापती जितेंद्र शिलवंत, उपसरपंच अनिल माळी, हरिभाऊ घाडगे, मनोज साठे, नागेश पवार, जयदीप साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

ग्रामपंचायत नेतृत्व तयार करणारी कार्यशाळा आहे. विजयदादा, विलासराव देशमुख हे राज्याचे नेतृत्व करणारे नेते पहिल्यांदा ग्रामपंचायतीत निवडून आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिकार होते. मात्र, नोकरशाहीने हे अधिकार गोठविले आहे. पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याची गरज आहे. फक्त मोहोळ मतदारसंघात आमदार यशवंत माने यांनी सर्वाधिक निधी दिला आहे. जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पुन्हा आमदार माने यांना निवडून द्यावे, तोपर्यंत आरक्षण रहावे असेही पाटील म्हणाले.

 

बळीरामकाका कधीच दुजाभाव करीत नाहीत उत्तर तालुक्यातील २४ गावात अजून बरेच कामे करायची आहेत. काही कामे मंजूर असून भाजप व शिंदे सरकारांनी त्याला स्थगिती दिली आहे, असे आमदार माने म्हणाले. यापुढेही आपण सर्वजण राष्ट्रवादीच्या पाठिशी खंबीरपणे उभी रहावे, काकानी जनतेची कामे केली असल्याचे जितेंद्र साठे म्हणाले.

तीन पिढ्यांचे स्नेहसंबंध पाटील व साठे परिवाराने टिकवून ठेवले असल्याचे जयदीप साठे म्हणाले. यावेळी अभिजीत पाटील, दयानंद पवार, शरद माने सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता मोकाशी, नागेश पवार यांनी आभार मानले.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #NakoreBaba #sarpanch #largevillage #Former #MLA #RajanPatil #YashwantMane #Shinde #government #suspended #charges, #मोठ्यागावचा #सरपंच #नकोरेबाबा #माजीआमदार #राजनपाटील #आमदार #यशवंतमाने #काम #स्थगिती #आरोप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article परिचारक – भालके समविचारी आघाडीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ; रिचेबल नेतृत्वाच्या शोधात
Next Article सोलापुरात पहाटे दत्तनगर येथे  गारमेंट कारखान्यांना लागली आग, कारखाने बंद असताना अचानक आग

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?