Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट । यात्रेच्या वादातून दगड आणि लाथाबुक्याने मारहाण; आठजणाविरुद्ध गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

अक्कलकोट । यात्रेच्या वादातून दगड आणि लाथाबुक्याने मारहाण; आठजणाविरुद्ध गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2023/04/27 at 4:29 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर – गावातील यात्रेच्या कार्यक्रमात गोंधळ घालू नका असे सांगितल्याच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून दगड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणी दोघेजण जखमी झाले. ही घटना अरळी (ता.अक्कलकोट) येथे सोमवारी (ता.24) रात्रीच्या सुमारास घडली. Akkalkot. Beating with stones and stones from Yatra disputes; Crime criminal conversation against eight people

 

या संदर्भात अतुल शिवशरण काळे (वय २९) यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी संतोष हांडगे, प्रकाश हांडगे, हेमंत हांडगे, राहुल हांडगे, शशिकांत हांडगे, बसवराज हांडगे आणि निखिल बोंदरे (सर्व रा.अरळी) अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी झालेल्या मारहाणी अतुल काळे आणि त्यांचे मित्र खंडू गमाजी हे दोघे जखमी झाले. मारहाणीनंतर आरोपीने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास हवालदार बिराजदार करीत आहेत .

 

○ मेघशाम नगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – मुळेगाव रोडवरील मेघशाम नगरात राहणाऱ्या सुभान बंदेनवाज पठाण (वय २३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. सुभान पठाण हा अविवाहित असून तो मजुरी करीत होता. त्याची आई आज सकाळी मजुरीसाठी कामाला गेली होती.

घरात एकटाच असताना त्याने छताच्या लोखंडी अँगलला साडिच्या सहाय्याने गएफास घेतला होता . या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही . पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

○ नजीक पिंपरी येथील अपघात; जखमी दुचाकी चालकाचा मृत्यू

सोलापूर – दुचाकीच्या अपघातात जखमी झालेले गणपत रोहिदास काळे (वय ४० रा. नजीक पिंपरी ता. मोहोळ) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना बुधवारी (ता. 26) सकाळी मयत झाले.

ते २१ एप्रिल रोजी आपल्या सहा वर्षाच्या मुलगा शंकर काळे याच्यासोबत मोहोळ ते घराकडे निघाले होते. विद्युत मंडळाच्या कार्यालयाजवळ समोरून अनोळखी वाहन धडकल्याने दोघेही जखमी झाले होते. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

 

○ लोधीगल्लीत दोन गटात रॉड आणि विटाने मारहाण, पाच जखमी

सोलापूर – लहान मुलाच्या भांडणावरून दोन गटात लोखंडी रॉड, वीट आणि लाथा बुक्क्याने झालेल्या मारहाणी ५ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 25) रात्रीच्या सुमारास सदर बाजार परिसरातील लोधी गल्लीत घडली. सर्वांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ज्योतिर्लिंग लक्ष्मणसिंग मनसावाले (वय ३८ रा.बापूजीनगर),अजय दिल्लीवाले (वय ३०) आणि गणेश शिवशिंगवाले (वय ३८ दोघे रा.लोधी गल्ली) असे पहिल्या गटातील जखमींची नावे आहेत. काल रात्री लोधी गल्लीत त्यांच्या नातेवाईकांचे भांडण सुरू होते.ते सोडविण्यास गेले असता तुम्ही मधे का पडला? असे म्हणत अक्षय चौधरी, अविनाश चौधरी यांच्यासह सहा जणांनी त्यांना लोखंडी रॉ आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली.

तर दुसऱ्या गटात अभिषेक मोहन चौधरी (वय २२ रा. बापूजीनगर) आणि प्रकाश मौलावाले (वय ४२ रा.लोधीगल्ली) हे दोघे जखमी झाले.गल्लीतील लहान मुलगा पायी जाताना तोल जाऊन एका महिलेच्या अंगावर पडला होता. त्यावेळी महिलांनी मुलास शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी दोघे गेले असता विकी दिल्लीवाले, अर्जुन दिल्लीवाले आणि अन्य तिघा जणांनी त्यांना विटाने मारहाण केली. अशी नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Akkalkot #Beating #stones #stones #Yatra #disputes #Crime #criminal #conversation #eight #people, #अक्कलकोट #यात्रा #वाद #दगड #लाथाबुक्के #मारहाण #आठजणाविरुद्ध #गुन्हा #गुन्हेगारी #बातम्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article milk prices वाढलेल्या दुधाच्या दरात ‘मिठाचा खडा’; मागणीत वाढ तरीही ‘दुधदरात कपात’
Next Article ‘राधाकृष्ण विखे-पाटलांनी मुख्यमंत्री व्हावे; शिंदे गटाच्या मंत्र्यांची इच्छा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?