Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : तिल्हेहाळमध्ये आईसह दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : तिल्हेहाळमध्ये आईसह दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/05/11 at 9:54 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली. या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे. Solapur: Two young children died with mother in Tilahhal

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे एका विवाहितेसह तिच्या दोन मुलांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आत्महत्येचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोनाली सिद्राम चोपडे (वय ३२ रा. तिल्हेहाळ ) आणि तिची मुले संतोष (वय ८) व संदीप (वय ५) अशी मृत मायलेकांची नावे आहेत.

सोनाली चोपडे ही मूळची तिल्हेहाळ (ता. दक्षिण सोलापूर) या गावची राहणारी होती. आलेगावात दयानंद वसंत शिंदे यांच्या शेतातील विहिरीत सदर महिलेसह दोन्ही मुले पाण्यात बुडाल्याचं समोर आलं. ग्रामस्थांना हे समजलं असता त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यांना बाहेर काढले असता तिघेही मृतावस्थेत आढळून आले. वळसंग पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

चोपडे दांपत्य हे मूळ तिल्लेहाळ येथे राहणारे असून त्यांची थोडीफार शेती आलेगाव येथे आहे. तिचा पती सिद्राम चोपडे हा शेती आणि मजुरी करतो तर सोनाली ही घरकाम तसेच शेळ्या राखण्याचे काम करीत होती. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र तिने मुलासहित आत्महत्या का केली? हे मात्र  समजले नाही. या घटनेची नोंद वळसंग पोलीसात झाली असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरवसे हे करीत आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ कामगारांच्या बेपवाईचा फटका :
पिण्याचे पाणी म्हणून नववधूला दिले केमिकल प्यायला

सोलापूर : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यामुळे लग्नाचे कपडे खरेदीसाठी अनेक दुकानांमधून गर्दी होत आहे. अशाच येथील एका कापड दुकानात बस्ता खरेदीसाठी आलेल्या नववधूला पिण्याचे पाणी म्हणून चक्क फिनेलयुक्त पाणी दिल्याने तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कडक उन्हाळ्यामुळे सध्या सर्वांचीच लाहीलाही होत आहे. अशात वारंवार तहान लागत आहे. त्यामुळे मिळेल तेथे पाणी पिले जात आहे. मात्र, असे पाणी पिणे एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पंढरपूर शहरातील एका कापड दुकानात गोपाळपूरमधील एक कुटुंब नववधूसह लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेले होते. खरेदी सुरू असताना नववधू तरुणीला तहान लागली. त्यावेळी तिने तेथील कामगारांना पाणी मागितले.

गडबडीत कामगाराने पाण्याच्या बाटलीत फरशी पुसण्यासाठी ठेवलेले लायझोल केमिकल नजरचुकीने पाणी समजून पिण्यास दिले. त्या बाटलीतील पाणी पिताच तरुणीला घशात जळजळ होऊ लागली. हा सर्व प्रकार दुकानदार मालकाच्या लक्षात आला.

यामुळे सदर तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे तिच्यासह संपूर्ण कुटुंब चांगलेच घाबरले होते. उपचारानंतर सदर तरुणीची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही. मात्र, कामगारांच्या बेपवाईचा फटका या कुटुंबाला सहन करावा लागला.

 

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Solapur #Two #young #children #died #mother #Tilahhal, #सोलापूर #तिल्हेहाळ #आई #दोन #लहान #मुलांचा #बुडून #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वैरागमध्ये रेल्वेतून डिझेल चोरीचा गुन्हा, टेम्पो एसटीला धडकून क्लीनर ठार
Next Article electricity सोलापूर : झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम करताना दोन वीज कर्मचा-यांना बसला शॉक, एकाचा मृत्यू

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?