Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शी : चोरांच्या टोळीतील भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बार्शी : चोरांच्या टोळीतील भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून

Surajya Digital
Last updated: 2022/04/04 at 9:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : चोरांच्या टोळीतील भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाला त्या टोळीच्या सदस्यांनी निर्घृणपणे मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना वैराग येथे घडली आहे.

याबाबत मयताचा भाऊ सुरेश महादेव पवार (रा. संजयनगर, वैराग ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हरी केकडे (रा. वैराग), जुबेर शेख, मिथुन साळवे  व अखील यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पवार कुटुंबियांची वीटभट्टी आहे. फिर्यादी आणि त्याचा भाऊ सचिन उर्फ पप्पू हे दोघे मिळून वीट विक्रीचा व्यवसाय करत होते. शनिवारी (दि 2) सायंकाळी 4:30 वा. चे सुमारास सुरेश हा घराजवळ असताना त्याला राजाभाऊ पांढरमिसे यांने फोन करुन भाऊ सचिन याला कांबळे याचे दुकानात मारहाण चालु आहे, असे सांगितले. त्यामुळे तो आईला घेऊन तात्काळ कांबळे यांचे सोलापूररोडवरील चप्पलच्या दुकानात गेलो असता  तेथे संतोष  गणेचेरी, सुनिल धोकटे, चंदु कावरे व विठ्ठल कांबळे होते. दुकानासमोर सचिन उर्फ पप्पु हा जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला होता व तो विव्हळत दवाखान्यात घेवुन चला, असे म्हणत होता.

यावेळी पप्पुने त्यांना हरी आणि त्यांच्या टोळीमध्ये चोरीच्या सोन्यावरून चाललेली भांडणे मी सोडविली. त्यावेळी बोलताना तुमच्या टोळीचे नाव मी पोलीसांना सांगून तुमच्या टोळीचा भांडाफोड करीन असे म्हटले होते. याचा  राग  मनात धरून आरोपींनी कांबळे याचे दुकानातील लाकडी ठोकळ्याने व धारदार हत्याराने त्यास मारहाण केली आणि तो रक्तबंबाळ होवून जमिनीवर पडल्यावर ते त्याची मोटारसायकल घेवून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Barshi: The brutal murder of a young man who went to mediate in a gang of thieves

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

त्यास तातडीने उपचारासाठी प्रथम बार्शी व नंतर सोलापूरला हलविले. मात्र उपचार घेत असताना तो मरण पावला. याप्रकरणी तपासाधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी प्रारंभिक तपास करुन हरी केकडे यास अटक केली. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

□ डॉक्टरचे घर फोडून 50 हजारांचा ऐवज लंपास

बार्शी : येथील अलिपूर रस्त्यावरील माऊली चौकात राहणार्‍या गणेश भागवत वैद्य या डॉक्टरांचे  घर फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील सुमारे 50 हजारांचा ऐवज पळविला. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. वैद्य हे आई-वडिलां समवेत राहतात. रात्री 11 च्या सुमारास घरातील सर्वजण झोपले होते. पहाटे 5 वा. उठून आईने घर झाडण्यास सुरुवात केली असता बेडरुमचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी बाहेरील बाजूस जावून बेडरुमची खिडकी पाहिली असता खिडकीचे उजव्या बाजूचे ग्रिल काढुन खाली  टाकलेले होते. खिडकी अर्धवट उघडी होती.

त्यानंतर आईने त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टार्च लावून पाहिले असता  कपाटातील सर्व  कपडे व साहित्य सर्वत्र अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर स.पो.नि. ज्ञानेश्वर  उदार सहकार्‍यांनिशी तिथे गेले. त्यांनी घरी येवून  खिडकीतून आत जावून बेडरुमचा दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर सर्वांनी आत जावुन पाहिले असता लोखंडी व फर्निचरच्या कपाटाचा  दरवाजा उचकटलेला दिसला. त्यामधील चांदीचा शिक्का व नवीन साड्या तसेच खिडकीत ठेवलेले दोन घड्याळ, पॅकेट व मोबाईल असा सुमारे 50 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे आढळून आले.

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #Barshi #brutal #murder #youngman #went #mediate #gang #thieves, #बार्शी #चोर #टोळी #भांडण #मध्यस्थी #तरुण #निर्घृण #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळ : ओमनीकार ट्रकवर धडकली; दोन ठार चार जखमी, मृतात पोलिसाचा समावेश
Next Article अक्कलकोटमध्ये कर्नाटकबसने भरधाव वेगात दिली धडक; वडापाव दुकानाचे चालक ठार

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?