नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग पुन्हा मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे. युवराजने निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. परंतु युवराज पंजाबकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीकडे त्याने परवानगी मागितली आहे. दरम्यान, पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्याला अॉफर दिली असून त्याने ती स्वीकारली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय संघाचा माजी डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी युवराज पंजाबकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार झाला आहे. यासंदर्भात युवराजने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराजला पंजाबच्या संघाचा मेंटॉर कम खेळाडू अशी ऑफर दिली होती. पंजाब संघामधील तरुण खेळाडूंना युवराजच्या अनुभवाचा फायदा होईल असं काही अधिकाऱ्यांचं मत होतं. पंजाब क्रिकेट असोसिएशनची ही ऑफर युवराजने स्विकारलेली आहे.
बीसीसीआयने युवराजला पुन्हा खेळण्याची परवानगी दिल्यास, तो पंजाब संघाकडून फक्त टी-२० क्रिकेट खेळेल. इतर स्पर्धांमध्ये मला सहभागी होता येणार नसल्याचंही युवराजने स्पष्ट केलंय. पंजाबच्या संघाला पुन्हा एकदा जुने दिवस दाखवून विजेतेपद मिळवून द्यायचं हे माझं ध्येय आहे. मी आणि हरभजन एकत्र खेळत असताना आम्ही हे करुन दाखवलं होतं, पण यानंतर तो योग जुळून येत नाहीये. यासाठी पुनरागमनाचा निर्णय घेतल्याचं युवराजने सांगितलं.