Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: युवक काँग्रेस, प्रियदर्शनी सेलतर्फे हाथरसमधील पीडितेला श्रद्धांजली वाहून केला योगी सरकारचा निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

युवक काँग्रेस, प्रियदर्शनी सेलतर्फे हाथरसमधील पीडितेला श्रद्धांजली वाहून केला योगी सरकारचा निषेध

Surajya Digital
Last updated: 2020/09/30 at 9:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : उत्तर प्रदेश हाथरस येथील सामूहिक अत्याचारामध्ये बळी पडलेल्या पीडितेला युवक काँग्रेस व प्रियदर्शनी सेल च्या वतीने आज (बुधवारी) रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात श्रद्धांजली वाहून आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, प्रियदर्शनी सेल प्रमुख श्रद्धा हुल्लेनवरु, प्रियंका डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, शहर मध्य योगेश मार्गम, दक्षिण सोलापुर अध्यक्ष सैफन शेख, गोविंद कांबळे, राणी वाघमारे यांची उपस्थिती होती.

प्रियदर्शनी सेलच्या श्रद्धा हुल्लेनवरु म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिकपणे अमानुष बलात्कार करण्यात आला. प्रचंड मारहाण करुन झालेल्या अत्याचाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभही कापण्यात आली. 9 दिवस पोलिसांनी कोणतीच करवाई केले नाही. गंभीर अवस्थेत असतानादेखील योग्य ते उपचार मिळाले नाही. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तिच्या यातना कमी झाल्या नाहीत. उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने जबरदस्ती करून त्या मुलीच्या परिवाराच्या अनुपस्थितीमध्ये त्या मुलीचा अंत्यविधी केला. या सर्व प्रकारचा जोरदार निषेध केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी केली. यावेळी प्रियंका डोंगरे यांनीही आरोपींना फाशी शिक्षा देण्याची मागणी केली

यावेळी विवेक इंगळे, संजय गायकवाड, राजेन्द्र शिरकुल, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, विश्वास गज्जम, रोहित भोसले, श्रीवेणी आड़म, साक्षी गवळी, प्रगती डोंगरे, उमर मुकेरी, आनंद भंडारे, सचिन हेगाडे, प्रकाश नाइकवाडी, सौरभ साळुंखे, श्रीनिवास परकीपंडला, संजय फरड, शंकर माडेकर, अश्विनकुमार आतकरे, मुजाहिद जमादार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #युवककाँग्रेस #प्रियदर्शिनीसेल #हाथरस #पीडित #योगीसरकार #निषेध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाबरी प्रकरणात भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणतात न्यायाचा विजय तर अडवाणी काय म्हणाले ?
Next Article शरद पवारांना धक्का; नातू पार्थ पवार पुन्हा गेले विरोधात

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?