Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

Surajya Digital
Last updated: 2022/05/10 at 11:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांची राज्यमंत्री तटकरे यांच्याकडे मागणी

पंढरपूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांनी उद्योग, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री  अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Dismiss Shri Vitthal Rukmini Mandir Samiti; Demand of Nationalist Youth Congress Shrikant Shinde Aditi Tatkare

यंदाची आषाढी वारी १२ जून रोजी आहे. मंदिर समितीची मुदत पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर, नवीन श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांनी राज्यमंत्री तटकरे यांच्याकडे केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये महाराष्ट्रातील सर्व समित्या, मंदिर समित्या नव्याने पुर्नगठीत करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या काळात स्थापन झालेली व सध्या अस्तित्वात असलेल्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. या दरम्यानच्या कालावधीत विद्यमान सदस्य मंडळ मंदिर समितीच्या कोट्यावधी रूपये खर्चाचे निर्णय घेत आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

शिर्डी येथील साई संस्थानवर तात्काळ पुर्नगठन करून नवीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतू पंढरपूर येथील  मंदिर समितीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सदरची समिती तात्काळ बरखास्त करून नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी उद्योग, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, लवकर समिती स्थापन केल्यास आषाढी यात्रा २०२२ मध्ये या नवीन विश्वस्तांना चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळेल. समिती उशिरा स्थापन झाल्यास नवीन विश्वस्तांना आषाढी यात्रा कालावधीत काम करण्यास अडचणीचे ठरेल. तरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करून नवीन समिती लवकरात लवकर स्थापन करावी.

विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार स्थापन होवून सुमारे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. या समितीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपचे राज्यात सरकार नसतानाही त्यांनी नेमलेली समिती कार्यरत असल्यामुळे, ती  मंदिर समिती तात्काळ बरखास्त करावी आणि नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी , अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.

 

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Dismiss #ShriVitthalRukmini #Mandir #Samiti #Demand #Nationalist #Youth #Congress #ShrikantShinde #AditiTatkare, #श्रीविठ्ठलरूक्मिणी #मंदिर #समिती #बरखास्त #राष्ट्रवादी #युवक #काँग्रेस #मागणी #श्रीकांतशिंदे #आदितीतटकरे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, राज ठाकरेंचा भाऊ मुख्यमंत्र्यांना इशारा
Next Article कुलस्वामिनीला छत्रपती घराण्याचा मान, भवानीमातेसमोरच केला वंशजाचा अपमान

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?