Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जि.प.च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे तर स्मिता पाटील पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर जि.प.च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे तर स्मिता पाटील पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी

Surajya Digital
Last updated: 2021/09/02 at 10:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे यांची साताराहून बदली झाली आहे.  तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची नाशीक येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाले नंतर त्यांचे रिक्त पदावर संतोष धोत्रे यांची बदली झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री संतोष धोत्रे यांनी प्रभावी पणे काम केले आहे. अॅग्रीकल्चरल मध्ये पदवीधर असलेले संतोष धोत्रे यांनी २००१ व २००२ मध्ये महसूल विभागामध्ये काम केले आहे.

नाशीक व नगर येथे परिविक्षाधिन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सोलापूर, धुळे व सिंधूदुर्ग येथे त्यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. तत्कालीन पर्यावरण मंत्री यांचे ते खाजगी सचिव म्हणून  मंत्रालयात काम केले आहे. सन २०१५ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाले नंतर जालना येथे ३ वर्षे व त्या नंतर सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापूर येथील कामाचा त्यांना दिर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. किटकनाशके व फळांवरील अवशेष परिणाम यावर त्यांनी शोधनिबंध लिहिला आहे. २००३-४ मध्ये मगर जिल्हयात काम करीत असताना पाथर्डी येथील पाणी टंचाई आराखडा व त्यांची अंमलबजावणी हा पथदर्शी प्रकल्प ठरला.

राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यातील ३४ गटविकास अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या गुरुवारी केल्या आहेत. त्यात पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार यांची अहमनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गोरख शेलार हे मागील आठ महिन्यांपूर्वी पाणी व स्वच्छता विभागात नियुक्ती झाली होती, केवळ आठ महिन्यात त्यांची बदली झाली, त्यांनी विनंती बदली घेतली असल्याचे समजले. स्मिता पाटील या माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी होत्या. त्या आता मुख्यालयात पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Solapur #Zip's #Additional #ChiefExecutiveOfficer #Dhotre #Smitapatil #WaterSanitation #Department, #सोलापूर #जिपच्या #अतिरिक्त #मुख्यकार्यकारीअधिकारी #धोत्रे  #स्मितापाटील #पाणीस्वच्छता #विभाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी उपनगराध्यक्षाच्या पुतण्याचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
Next Article पोस्टात 4 हजार 845 जागांवर भरती, 22 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?