महिलेसह सात जणांवर गुन्हा
नातेपुते -रक्कम गुंतवल्यास दुप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून एका मेडिकल दुकानदाराला १० लाखास गंडविण्यात आले. या घटनेची बैठक नातेपुते येथे १७ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी नातेपुतेच्या पोलिसांनी पुण्यातील एका महिलेसह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात प्रणव प्रभाग (वय ३४ रा. फलटण जि .सातारा) यांनी नातेपुते पोलिसात नुकतीच फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अजित विनायक चव्हाण (रा. कोरडगाव जि.सातारा) सुनिता अनिल कांबळे (रा.माळेगाव पुणे ), विशाल पाटील उर्फ नाना साळवे (रा.सातारा ) आणि अन्य चौधे अशा ७जणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .
प्रणव याच्या परिचयातील अजित चव्हाण याने आमच्याकडे पैसे गुंतवल्यास दुप्पट रक्कम देतो असे म्हणत प्रणवला नातेपुते येथे 17 मार्च रोजी मिटींगला बोलावले होते. विश्वास संपादन केल्यानंतर वरील आरोपींनी त्याला पैसे घेऊन 21 मार्चच्या दुपारी लोणावळा येथे बोलावले . त्याप्रमाणे प्रणव हा आपली मोटार घेऊन लोणावळ्याला गेला होता. तेथून पुढे कांही आरोपीने त्याला खोपोली येथील मॅजिक पॉईंट येथे नेले.आणि त्याला खाली उतरण्यास लाऊन पैसे काढून घेतले. त्यावेळी अचानक तोतया पोलिसाचे वाहन आले. आणि पैशासहित काही जणांना ताब्यात घेऊन निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे नाटक समजल्यानंतर प्रणवने नातेपुते पोलिसात फिर्याद दाखल केली .पुढील तपास फौजदार दिघे करीत आहेत.