Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी 22 जणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी 22 जणांना अटक

admin
Last updated: 2025/04/10 at 2:32 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

कोलकाता,10 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी 22 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सध्या परिस्थिती शांत आणि नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलिस धिकाऱ्यांनी सांगितले.

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये 8 एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे. यापैकी 8 आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. याबाबत जांगीपूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) आनंद रॉय म्हणाले की, पोलिसांनी हिंसाचाराची स्वतःहून दखल घेतली आहे आणि गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या 8 एप्रिल रोजी वक्फ सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजकंटकांनी अनेक वाहनांना आग लावली होती. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश होता. या संघर्षादरम्यान निदर्शकांनी दगडफेकही केली, ज्यामुळे अनेक पोलिस जखमी झाले. दरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत 12 याचिका दाखल झाल्या आहेत. आगामी 16 एप्रिल रोजी न्यायालय 10 याचिकांवर सुनावणी करणार आहे. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभरात निषेध करणार आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटक सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांना अटक
Next Article गुजरात : दूषित पाण्यामुळे 110 जण रुग्णालयात

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?