Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस

admin
Last updated: 2025/06/18 at 7:58 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे , 18 जून (हिं.स.)।संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची आषाढी वारी सुरक्षित आणि सुशोभित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठ्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. त्यानुसार, यंदाच्या आषाढी वारीत साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा राहणार आहे. यामध्ये गर्दीमध्ये साध्या वेशातील आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलिस वारीत सहभागी होणार आहेत.

देहू येथून बुधवारी (दि. १८) संत तुकाराम महाराज पालखी, तर आळंदी येथून गुरुवारी (दि. १९) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही दिवशी पालखी मार्गावरील वाहतूक, पार्किंग, गर्दी नियंत्रण, वारकऱ्यांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने मोठ्या फौजफाट्यासह बंदोबस्त आखला असून त्यामध्ये पोलिस सहआयुक्त, अपर आयुक्त, सहा उपायुक्त, ११ सहायक आयुक्त, ६१ निरीक्षक, १७२ उपनिरीक्षक, २६३४ अंमलदार, ८०० होमगार्ड, तीन एसआरपीएफ कंपनी, चार बीडीडीएस पथक, तीन रॅपिड कंट्रोल पथक (आसीपी), १२ स्ट्रायकिंग फोर्स यांचा समावेश असणार आहे. देहू आणि आळंदी येथे तसेच पालखी मार्गांवर ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले आहेत. त्यावरून सोहळ्यावर ‘वाॅच’ ठेवण्यात येणार आहे. वारीदरम्यान, चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून गर्दीमध्ये साध्या वेशातील आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलिस वारीत सहभागी होणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे.

देहू आणि आळंदी येथील पालखी सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला असून डायल ११२ या हेल्पलाइनवरूनही तत्काळ पोलिस मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे. तसेच परराज्यातील तसेच परजिल्ह्यातून सराईत सोनसाखळी चोर तसेच पाकीटमार वारीत येतात. अशा चोरट्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राज्यभरातील पोलिसांची त्यासाठी मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे अशा चोरट्यांची ओळख पटवणे सहज शक्य होत असून, त्यांच्यावर ‘वाॅच’ राहणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
Next Article सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?