नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर अधिवेशन बोलवू नये, असे सर्वसाधारण मत पुढे आले होते.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, ‘कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं अनेकाचं मत होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट जानेवारीत बोलावण्यात येईल.’ बजेट सत्र मागील वर्षी 31 जानेवारीपासून सुरू झाले होते, तर 2018 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* काँग्रेसचा सरकारवर आरोप
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ‘जरी हिवाळी अधिवेशनाचे काही दिवसच उरले असले तरी. संसदेत शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर केंद्र सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे.’
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पत्र लिहून, कोरोनामुळे या वेळी हिवाळी अधिवेशन घेता येणार नाही आणि आता पुढच्या वर्षी जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी पत्रात लिहिले की कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरमध्ये सुरू झाले आणि बरीच महत्त्वाची प्रोटोकॉल पाळावी लागली. अलीकडे, कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे, परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे आणि दिल्लीतही प्रकरणे वाढली आहेत.’