Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुस्लिमांसाठी भारत धोकादायक आणि हिंसक देश बनला – अहवाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मुस्लिमांसाठी भारत धोकादायक आणि हिंसक देश बनला – अहवाल

Surajya Digital
Last updated: 2020/12/16 at 12:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतातील असहिष्णुतेत गेल्या दोन वर्षांत वाढ झाली असून देश मुस्लीम अल्पसंख्यांकासाठी ‘धोकादायक आणि हिंसक’ झाला आहे, असं मत दक्षिण आशिया स्टेट ऑफ मायनॉरिटीज या अहवालात मांडण्यात आले आहे. देशातील सरकारविरुद्ध मत व्यक्त करणाऱ्या व्यक्ती आणि मुस्लीम समाजाबद्दलची असहिष्णुता वाढली आहे, भारतातील असहिष्णुता वाढत असल्याचंही या अहवालातून मांडण्यात आलं आहे.

भारत सरकारने डिसेंबर 2019 मध्ये सीएए लागू केल्यानंतर देशात अल्पसंख्याक विशेषत: मुस्लीम समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर करण्यात आला आहे. गेल्यावर्षाची अखेर विरोधातील आंदोलनांनी झाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुटान, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांतील नागरिकांना विशेषत: अल्पसंख्यांक नागरिकांना कितपत स्वातंत्र्य मिळते आहे याचा अभ्यास या अहवालात मांडला जातो. या सर्व देशांमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्वधर्मसमभाव यासारख्या लोकशाही मूल्यांची गळचेपी होत आहे, त्याचप्रमाणे भारतातील असहिष्णुता वाढत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारत मुस्लीम अल्पसंख्यांकासाठी ‘धोकादायक आणि हिंसक’ झाला आहे, असं निरिक्षण या अहवालात मांडण्यात आलं आहे.

* वचक बसवण्यासाठी धर्माच्या आधारावर वेगळी वागणूक

अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून 2014च्या अखेरीपर्यंत भारतात निर्वासित झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्याचा अधिकार सीएए अंतर्गत देण्यात आला असून सरकार त्यांना नागरिकत्व देणार आहे. पण या मुस्लीमबहुल तीन देशांतील मुस्लीम निर्वासितांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. सरकारने नॅशनल रजिस्टर ऑफ इंडियन सिटिझन लागू केल्यामुळे सरकार बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या निर्वासितांना देशाबाहेर काढू शकते. पण काही टीकाकारांचं मत असं आहे की देशातील धार्मिक अल्पसंखाकावर वचक बसवण्यासाठी आणि त्यांना धर्माच्या आधारावर वेगळी वागणूक देण्यासाठी सरकार सीएएसारख्या कायद्यांचा वापर करत आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #मुस्लिमांसाठी #भारत #धोकादायक #हिंसकदेश #बनला #अहवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगोल्यात पीएम किसान सन्मान योजनेत दीडहजाराहून अधिक बोगस लाभार्थीं, धावपळ सुरू
Next Article प्रत्येक बालकाला दरमहा दोन हजार द्या, सुप्रिम कोर्टाचे आदेश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?