Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आणखी काही बिबट्यांचा वावर, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आणखी काही बिबट्यांचा वावर, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2020/12/20 at 11:54 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : करमाळा तालुक्यात तिघाजणांना ठार मारून दहशत माजविलेल्या बिबट्याला ठार मारण्यात यश आले. मात्र करमाळा तालुक्यात आणखी काही बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनसंरक्षक विभागाचे अधिकारी धैर्यशील पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.

आज रविवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर शासनाच्या नियमानुसार इनकॅमेरा अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल सोमवारी सायंकाळपर्यंत येणार आहे, असे स्पष्ट करत
करमाळा तालुक्यात मारण्यात आलेला बिबट्या 20 ते 22 दिवसांपूर्वी बीडच्या वन विभागाला दिसला होता.बीडमध्येही या बिबट्याने माणसांवर हल्ला केला होता. परंतु त्याला पकडण्यात अपयश आले होते. त्यानंतर तो बिबट्या करमाळा तालुक्यात आला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बिबट्यामुळे मृत्यू झालेल्या तीन कुंटुंबातील व्यक्‍तींना शासनाच्यावतीने प्रत्येकी 5 लाख रूपये व त्यानंतर आठ दिवसांनी 10 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देणार आहोत. तर बकरी गाई, शेळ्या याचे जवळपास 1 लाख 12 हजार 500 रूपयांचे नुकसान या बिबट्याने केले असल्याची माहिती वनसंरक्षक पाटील यांनी दिली.

* ठार झालेला बिबट्या नरभक्षकच

करमाळा तालुक्यात शनिवारी ठार मारण्यात आलेला बिबट्या हा नरभक्षकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. माणसांवर हल्ला करणार्‍या बिबट्याचे तसेच ठार झालेल्या बिबट्याच्या पायांचे ठसे तपासण्यात आले असून, ते दोन्ही ठसे जुळत असल्याची माहिती उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांनी दिली. असे असले तरी करमाळा तालुक्यात आणखीन काही बिबटे असल्याचेही त्यांनी सांगितले.

* सर्वांच्या प्रयत्नांमुळे बिबट्याला मारता आले

21 ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी जाळे आणि 42 ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते. बिबट्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र यश आले नाही. शेवटी धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंदुकीच्या गोळीतून तो बिबट्या ठार झाला. या बिबट्याला ठार मारण्यात कोणा एकाचे यश म्हणता येणार नाही. सर्वांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला बिबट्याला मारता आल्याचेही वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

दरम्यान, बिबट्याला गोळ्या झाडण्याचा अधिकार सोलापूरचे 10 पोलिस, मंडिलक, तावरे, धवलसिंह मोहिते-पाटील यांना देण्यात आले होते. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंदुकीतील तीन गोळ्या बिबट्याच्या मस्तकात, मानेच्या खाली व पाठीमागे लागल्या. त्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. हा नरभक्षक बिबट्या 7 वर्षाचा, 7 फूट लांब आणि 55 किलो वजनाचा होता. या बिबट्यानेच आतापर्यंत जवळपास 9 लोकांचा जीव घेतला होता, तर 4 जणांना जखमी करून 11 जणांवर हल्‍ले केले होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #आणखीकाही #बिबट्यांचा #वावर #नागरिकांना #काळजी #घेण्याचे #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस, शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र
Next Article तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मतदान दिले तर रक्ताचे पाट वाहतील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?