Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार, उपमुख्यमंत्र्यांनी केले भरणे कुटुंबाचे सांत्वन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार, उपमुख्यमंत्र्यांनी केले भरणे कुटुंबाचे सांत्वन

Surajya Digital
Last updated: 2020/12/30 at 4:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे  यांचे काल मंगळवारी ( ता. 29) रात्री अकराच्या सुमारास पुण्याच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले.

वडिलांच्या निधनाची वार्ता कळताच राज्यमंत्री भरणेंवर दु:खाचा डोंगर कोसळला. भरणे यांच्या आयुष्यात तात्यांचं स्थान फार महत्त्वाचं होतं. त्यांच्या जडणघडणीत तात्यांचा मोठा वाटा राहिला आहे. आपले तात्या आता आपल्यात नाही, ही कल्पना त्यांना असह्य होत होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ते 90 वर्षांचे होते. राज्यमंत्री भरणे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. विठोबा भरणे यांच्या पार्थिवावर आज (30 डिसेंबर) दुपारी 12:25 वाजेच्या सुमारास त्यांच्या मुळगावी भरणेवाडी इथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरणेवाडीत राज्यमंत्री भरणे यांच्या घरी जाऊन विठोबा भरणे यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी भरणे कुटुंबांचे सांत्वन केले.

विठोबा भरणे यांच्या अंत्यसंस्कारावेळी इंदापुर तालुक्याबरोबरच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी साश्रुपूर्ण नयनांनी विठोबा भरणे यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी आमदार राहुल कूल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. भरणेवाडी नजीक असलेल्या गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून विठोबा भरणेंना आदरांजली वाहिली.

“लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.”

– दत्तात्रेय भरणे , पालकमंत्री

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #शोकाकूल #वातावरणात #अंत्यसंस्कार #उपमुख्यमंत्र्यांनी #भरणेकुटुंबाचे #सांत्वन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उपमहापौरावर खंडणीचा गुन्हा दाखल, अधिका-यास शिवीगाळ, गुन्हा दाखल होताच फरार
Next Article एलआयसीने पॉलिसीविषयी केले ट्वीटद्वारे आवाहन, दक्षता बाळगा अन्यथा पैसे बुडतील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?