मुंबई : राजद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहिणी रंगोली चंदेल अखेर आज शुक्रवारी मुंबईतील वांद्रे पोलिसात दाखल झाली. यावेळी जबाब देताना कंगना म्हणाली, की ‘मी केलेले ट्विट काही गैर नाही. माझ्या ट्विटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं वाटत नाही’. दरम्यान, 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगनाने याकडे दुर्लक्ष केलं होतं. आज स्वत: कंगना पोलिसात हजर झाली होती. आता पुढं काय? याकडे लक्ष लागलंय.
राजद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रानावत आणि तिची बहिणी रंगोली चंदेल अखेर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटतं नाही’ असं उत्तर पोलिसांना दिले. कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघींनी आपला जबाब वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला आहे. जवळपास 2 तास दोघींची पोलिसांनी चौकशी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये जबाब देताना “आपण केलेले ट्वीट काही गैर नाही, ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे, त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही’ असं उत्तर तिने पोलिसांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
* का झाला होता गुन्हा दाखल
राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केले होते. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघींना चौकशी करता तसंच जबाब नोंदवण्याकरता हजर राहण्याची नोटीस धाडली होती. पण कधी नातेवाईकांच्या लग्नाचे तर कधी कोविड -19 चे कारण देत कंगना पोलीस स्टेशनच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती आणि थेट या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगनाने याकडे दुर्लक्ष केले होते. पण, आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. आता पोलीस पुढे काय कारवाई करता हे पाहण्याचे ठरणार आहे.